सलमान खानबरोबर काम करण्यासाठी ऐश्वर्या रायने ठेवली 'ही' अट
अभिनेता सलमान खान व ऐश्वर्या राय यांची जोडी खूप पसंत केली गेली
दोघांच्याही अफेअर व ब्रेकअपची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात दोघांच्याही जोडीला खूप पसंती मिळाली
मात्र नंतर ही जोडी अधिक दिसून आली नाही
संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी सलमान व ऐश्वर्या यांना विचारले होते
मात्र हा चित्रपट करण्यासाठी ऐश्वर्याने काही अटी ठेवल्या होत्या
सलमानने या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारावी अशी ऐश्वर्याची अट होती
अल्लाउद्दीन व पद्मावती यांचे एकत्रित सीन नसल्याने ही अट तिने निर्मात्यांसमोर ठेवली
मात्र खिलजीची भूमिका असल्याने सलमानने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समोर आले