Photos : लग्नासाठी पुन्हा नटली अदिती राव हैदरी
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी व अभिनेता सिद्धार्थ यांच्या लग्नाचे फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत
सप्टेंबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले होते
लग्नाच्या सुमारे तीन महिन्यांनंतर तिने उदयपूरमध्ये पुन्हा लग्न केले आहे
त्यांनी ग्रँड वेडिंग केले आहे
अदितीने खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत
यामध्ये अदिती लाल रंगाच्या लहंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे
लाल फुलांच्या स्लीव्ह ब्लाउजसह मॅचिंग लेहेंगा घातलेला दिसला ज्यामध्ये बॉर्डरवर भरजरी काम केलं आहे आणि एक मॅचिंग लाल दुपट्टा घेतला आहे
तिने महाराणी नेकलेस तसेच मोठे कानातले घालून हा लूक पूर्ण केला आहे