गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2025 | 6:00 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane Death

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. वैष्णवीची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैष्णवीने आत्महत्या नाही तर तिची हत्या झाली आहे, असा दावा वैष्णवीच्या आई-वडिलांनी म्हणजेच कस्पटे कुटुंबाने केला आहे. दरम्यान, वैष्णवी मृत्यू प्रकरणाची चौकशी वाढली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांचा सखोल तपास सुरु आहे. वैष्णवीने ज्या फॅनला साडी अडकवत गळफास घेतला ती साडी आणि फॅन दोन्ही वस्तू फॉरेन्सिक रिपोर्टसाठी तपासणीसाठी दिला आहे.

वैष्णवीने ज्या फॅनला गळफास लावून घेतला आणि ज्या साडीचा वापर केला ते दोन्ही फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे. बावधन पोलीस ते फॅन व साडी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवणार आहेत. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. वैष्णवीने साडीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. हा पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का, हा प्रश्न असून लवकरच याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा – Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. हा त्रास इतका जास्त होता की, वैष्णवीने तिच्या पोटच्या नऊ महिन्याच्या बाळाचाही विचार न करता मोठं पाऊल उचललं. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या मंडळींना म्हणजेच सासरे,सासू, दीर, पती, नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणाने न्यायालयाची पायरी चढली असून आता वैष्णवीला न्याय मिळणार का याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

तसेच वैष्णवी प्रकरणात निलेश चव्हाण या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरुन अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये महत्त्वाचे काही व्हिडीओ असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, निलेशने तो लॅपटॉप व मोबाईल त्याचा नसल्याचा दावाही केला आहे. आता वैष्णवी प्रकरणात तो एक फॅन ७१ किलो वजन पेलवू शकणार होतं का याचा खुलासा लवकरच होईल.

Tags: crime newsdowry caseVaishnavi Hagawane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

"थोडीतरी लाज बाळगा", ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "म्हातारपणात..."
Entertainment

“थोडीतरी लाज बाळगा”, ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

जून 5, 2025 | 12:48 pm
Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Next Post
Priyanka Chopra talk about virginity

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण...”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.