सोशल मीडिया हे असं साधन आहे जिथे एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अशीच एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पसरत आहे ज्यात एका फुलराणीचा उल्लेख करण्यात आला आहे. कोण आहे सुबोधची फुलराणी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही पोस्ट खूप चर्चेत आहे. दिगदर्शक विश्वास जोसभि दिगदर्शित फुलराणी हा चित्रपट यंदाच्या गुडीपाडव्याला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात मुख्य भुमिकांपैकी विक्रम राज्याध्यक्ष ही भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारत असून अभिनेत्रीची म्हणजेच फुलराणी ही भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती.(phulrani)
====
हे देखील वाचा – अमेरिकेच्या कानात वाजणार कुर्रर्रर्रर्र…..
====
पण आता गुलदस्त्यातलं हे सत्य बाहेर आलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली फुलराणी कोण आहे हे आता समोर आलं आहे. महाराष्ट्राची हाय जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही भूमिका साकारनार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच या चित्रपटाचा एक टीजर लाँच करण्यात आला आहे. ज्या मधून फुलराणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.(phulrani)

फुलराणी हा चित्रपट एक प्रेमकहाणी आहे जी ‘पिगमेलियन’ या कलाकृतीवर प्रेरित आहे.(phulrani)