Kareena Kapoor Khan Post : आई-मुलाचं नातं हे सर्व नात्यांपैकी खास आहे. अशातच कलाकार मंडळी व त्यांची मुलं यांचंही खास बॉण्ड असल्याचं पाहायला मिळतं. सेलिब्रिटींच्या मुलांबाबत जाणून घ्यायलाही चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. अनेक कलाकार त्यांच्या मुलांबरोबरचे खास बॉण्डिंग नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशातच एका सेलिब्रिटी आई-मुलाची जोडी म्हणजेच करीना कपूर व तैमूर अली खान. करीना व तैमूर यांची आई-मुलाची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बरेचदा हे दोघे पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसतात. करीना नेहमीच वेळात वेळ काढून तिच्या मुलांना वेळ देताना दिसली आहे.
२०१२ साली करीना अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. करीना व सैफ दोन्ही मुलांची काळजी घेताना दिसत असतात. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. शाळेत घेऊन जाण्यापासून ते त्यांना खेळायला घेऊन जाण्यापर्यंत करीना मुलांकडे लक्ष देते. अशातच करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला हा फोटो तैमूर अली खानचा असल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – गोविंदा पत्नी व मुलांसह एकत्रित राहतच नाही?, बायकोचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “रोमान्ससाठी वेळ नाही आणि…”
करीनाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तैमूर पाठमोरा उभा असलेला पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर तैमूरच्या हातात आईच्या चपलाही पाहायला मिळत आहेत. आईच्या चपला हातात घेऊन जाताना काढलेला हा तैमूरचा हा फोटो पोस्ट करत करीनाने असं म्हटलं आहे की, “आईची सेवा यावर्षी आणि कायम. नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो. अधिक फोटो लवकरच येत आहेत, संपर्कात राहा”. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तैमूरचं कौतुक केलं आहे. शिवाय त्याच्यावरील संस्कारांचंही कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – Paaru Serial Update : अनुष्काचं पारूविरुद्ध मोठं कारस्थान, आदित्य वाचवू शकेल का?, मालिकेत मोठा ट्विस्ट
करीनाने तिच्या अभिनयातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. ती फक्त नवाबांची सूनच नसून ती दोन लेकांची आईदेखील आहे. तैमूर अली खान व जहांगीर अली खान ही तिच्या मुलांची नावं आहेत. करीना एक अभिनेत्री असली तरीही ती एक आईदेखील आहे. त्यामुळे ती नेहमी तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना दिसते. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त असतानाही वैयक्तिक आयुष्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही.