सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. नुकताच अक्षयाचा २८ वा वाढदिवस झाला, हा वाढदिवस एखाद्या महागड्या रेस्टोरंटमध्ये वा हॉलिडे डेस्टिनेशनला न करता एका खास ठिकाणी साजरा केला आहे. अक्षया नाईकने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवभरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Akshaya Naik Birthday)
अक्षया नाईकने तिच्या वाढदिवसानिमित्त गरीब मुलांना अत्यल्प खर्चात शिक्षण देणाऱ्या एका शाळेला भेट दिली. ठाण्यामध्ये द्रोणाचार्य फाउंडेशनकडून चालवण्यात येणाऱ्या पब्लिक स्कूलमध्ये अक्षयाने तिचा वाढदिवस साजरा केला. याचा एक व्हिडिओही अक्षयाने शेअर केला. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, लहानपणापासून मी माझ्या आई वडिलांना, माझ्या नानीला इतरांना निस्वार्थिपणे मदत करताना पाहिलंय. स्वतःची परिस्थिती असो व नसो, समोरच्याला देण्याची दानत असणं महत्त्वाचं.
पाहा अक्षयाचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन (Akshaya Naik Birthday)
मी अनेक वर्ष माझ्या वाढदिवसाच्या दिवशी असेच काहिसे उपक्रम करत आहे, पण त्याची publicity केली नाही, कारण ती फार personal गोष्ट आहे जी मला आनंद देते. आज याबद्दल टाकण्याचं कारण हे, की चांगल्या गोष्टी आणि आपले चांगले हेतू इतरांना माहित असणं पण तितकच महत्त्वाचं आहे. Awareness create व्हावा म्हणून.(Akshaya Naik Bday Celebration)

आपण वाढदिवशी हमखास ३-७ हजार रुपये स्वतःच्या shoppingवर, मित्रांना पार्टी देताना खर्च करतो. विचार करा जर हीच, किंवा यातली थोडी जरी रक्कम तुम्ही बाजुला काढून या लहान मुलांसाठी काही केलंत तर त्यांना किती आनंद आणि तुम्हाला किती पुण्य मिळेल !!!! माझ्या वाढदिवसानिमित्त मी आव्हान करते, तुम्ही किमान एक मूल दत्तक घ्या. आपल्या एका वेळेच्या पार्टीचा जो खर्च होतो, तो त्या मुलांची वर्षाभराची फी असते. नक्की विचार करा !! माझा वाढदिवस तर नक्कीच happy होता, तुमचा पण happy होईल.
हे देखील वाचा – ‘पण त्यावेळी वडिलांनी परवानगी दिली नाही’अमृताने शेअर केला किस्सा
अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने त्या शाळेतील मुलांसोबत वेळ घालवला. शाळेतल्या मुलांनी अक्षयासाठी ‘हॅप्पी बर्थडे’ गाणं देखील गायलं आहे, शिवाय अक्षयाने मुलांसोबत केकही कापला. यावेळी अक्षयाचा आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
