KP Choudhary Commits Suicide : संकारा कृष्ण प्रसाद चौधरी उर्फ केपी चौधरी हे चित्रपट वर्तुळातील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. केपी चौधर यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी त्यांनी गोव्यात आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. तमिळ चित्रपट ‘कबाली’ची तेलुगु आवृत्ती प्रदर्शित करण्यासाठी निर्माता ओळखला जातो. चित्रपटाच्या वितरणाचे हक्क मिळवण्यासाठी त्याने बॉम्बचा वापर केला आणि त्यावेळी खळबळ उडाली. इतकंच नाही तर ड्रग्ज प्रकरणाशीही त्याचा संबंध होता.
२०२३ मध्ये सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने त्याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. केपी चौधरीने टॉलीवूड आणि कॉलीवूडमधील अनेक प्रमुख चित्रपट व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्याचे व्यावसायिक वर्तुळातही ग्राहक होते. अहवालानुसार, केपी चौधरी आर्थिक मंदीतून जात असल्याचं समोर आलं, ज्यामुळे त्यांना सावकारांच्या दबावाचा सामना करावा लागला.
आणखी वाचा – मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरचा लग्न करण्याचा निर्णय?, म्हणाला, “रिअल पत्नीबद्दल…”
वैयक्तिक आणि व्यावसायिक कारकीर्दीत अनेक अडथळ्यांना तोंड दिल्यानंतर, त्यांनी गोव्यात ओएचएम पब उघडला, जिथे तो ख्यातनाम व्यक्तींना ड्रग्ज वितरीत करत असे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.