भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कुणी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. पण ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अनेक मनमोहक फोटोंना चाहते लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिचे मास्टरचे शिक्षण पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (Sara Tendulkar Completed Her Masters)
अशातच आता तिचे वडील म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी काल (२४ मे) रोजी तिचा दीक्षांत समारंभ पार पडला असून याबद्दलची खास पोस्ट शेअर केली आहे. २४ मे रोजी सचिन यांनी त्यांच्या सोशल मीडिया पत्नी अंजली व मुलगी साराबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच एक व्हिडीओही शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये सारा तिच्या दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारतानाचे पाहायला मिळत आहे. सचिन यांनी खास पोस्टद्वारे लेकीच्या शिक्षणाबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे.
सचिन यांनी या पोस्टमध्ये “पालक या नात्याने, इथे येण्यासाठी तू गेली अनेक वर्षे केलेले सर्व काम पाहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे अजिबातच सोपे नव्हते. भविष्यातील तुझ्या सर्व स्वप्नांसाठी आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्हाला माहित आहे की तुम्ही ते खरे कराल. ढेर ‘सारा’ प्यार”. असं म्हणत आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या पोस्टद्वारे त्यांनी साराने UCL च्या मेडिसिन विभागातून, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषणमध्ये, डिस्टिंक्शनसह मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले असल्याची माहितीही दिली आहे.
मुंबईमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. दरम्यान, सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या मास्टर्स डिग्रीशी संबंचित काही फोटोही शेअर केले आहेत. साराच्या वर्कफ्रटबद्दल बोलायचे झाले तर, सचिनची मुलगी अभ्यासाबरोबरच मॉडेलिंगच्या क्षेत्रातही खूप लोकप्रिय आहे. तिने अनेक ब्रॅंडसाठी जाहिराती केल्या आहेत.