मराठी सिनेविश्वातील जेष्ठ तसेच प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील आपला पाया भक्कम रचला. तसं रेणुका यांना हास्य कधी आवरलंच नाही. पण “हम आपके हैं कौन” या चित्रपटातील सालस स्वभावाने आणि स्मित हस्याने रेणुका यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. परंतु तुम्हाला माहित आहे का? रेणुकाची “हम आपके हैं कौन” या चित्रपटासाठी तीन वेळा स्क्रिन टेस्टिंग झाली होती. आणि या नंतरच ज्यांचा रेणुकाला या चित्रपटात घेण्यासाठी नकार होता, त्यांनीच नंतर रेणुकाच्या आईचे आभार मानले होते. चला तर जाणून घेऊयात काय आहे किस्सा. (Renuka Shahane Film Selection)

या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बड़जात्या यांना एकाच दिवशी तीन जणांनी रेणुका यांचे नाव सुचवले होते. सुरज यांनी रेणुका यांना भेटायला बोलवल्यानंतर त्यांची तीन वेळा स्क्रीन टेस्ट घेतली होती. रेणुका यांना वाटलं त्यांचं काही चुकतंय पण तसं न्हवत.
हे देखील वाचा: ‘देशमुख कुटुंबीयांनी मला अभिनय करण्या पासून रोखलं होत’जुन्या अफवांवर जिनिलिया ने केला खुलासा
पहिल्या टेस्ट मध्ये सुरज यांनी रेणुका यांच्यासाठी स्पेशल साडी तयार करून मागवली होती. ही साडी पुढे रेणुका यांनी चित्रपटात देखील वापरली आहे. दुसऱ्या टेस्ट मध्ये रेणुका या प्रेग्नेंट दाखवल्यावर कशा दिसतील, हे बघण्यात आलं होत, आणि तिसऱ्या टेस्ट नंतर तू “हम आपके हैं कौन” करते आहेस. असं जाहीर करू शकतेस असं त्यांनी रेणुकाला सांगितलं. (Renuka Shahane Film Selection)
हे देखील वाचा: नाटकाच्या प्रयोगादरम्यान टाळ्यांमधून मिळाली कौतुकाची थाप
सुरुवातीला राजबाबू म्हणजेच राजकुमार बड़जात्या यांचा माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेसाठी रेणुकाला नकार होता. परंतु रेणुका “हम आपके हैं कौन” च्या ट्रायलला आईसोबत गेली असता, राजबाबू रेणुकाच्या आईला म्हणाले “थँक यु फॉर गिव्हिंग बर्थ टु रेणुका” माझ्या आयुष्यातील हा अविसमरणीय क्षण होता असं रेणुका म्हणतात. या चित्रपटानंतर रेणुका यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या, परंतु राजबाबू रेणुका यांना म्हणाले होते,
“हम आपके हैं कौन” हा चित्रपट तुला आयुष्य भर पुरणार आहे. असा एकही चित्रपट करू नकोस जेणेकरून “हम आपके हैं कौन” चं यश धुवून निघेल.