Raja Shivaji Release Date Announced : सध्या मराठी सिनेसृष्टीत एका ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. आणि हा चित्रपट म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’. रितेश देशमुखने २०२४ मध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून रितेश या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला ही दिसला. त्याचे सेटवर शूटिंग करतानाचे काही फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यामुळेच प्रेक्षक देखील या सिनेमाबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्साही दिसले.
या चित्रपटाची एक मोठी अपडेट रितेश देशमुखने प्रेक्षकांना देत सुखद धक्का दिला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पुढच्या वर्षी १ मे २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि त्याचसह एकूण सहा भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचा खुलासाही रितेश देशमुखने केला आहे. हा चित्रपट हिंदीसह इतर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटात झळकणाऱ्या कलाकारांची नावे देखील उघड झाली आहेत. ज्यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन,महेश मांजरेकर ,सचिन खेडेकर भाग्येश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते ही दिग्गज कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाबाबतची ही मोठी अपडेट रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा एक मोशन पोस्टर शेअर करत दिली आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत”, असं कॅप्शन देत त्याने चित्रपटाच्या मोशन पोस्टरची झलक दाखवली आहे. सध्या सर्वत्र रितेशच्या या बिग बजेट चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा – Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…
आता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली असून आता चित्रपटाची तारीख जाहीर केल्याने प्रतिक्षा संपली असून आता चित्रपटाची उत्कंठा चाहत्यांना लागून आहे. आतापर्यंत रितेश देशमुखच्या लूकचे दोन फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.