Raj Kundra On Pornography : अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. इतकेच नाही तर अश्लील सामग्री तयार करणे आणि वितरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्राशी संबंधित अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले. २०१२ मध्ये, त्याला अश्लील सामग्री तयार आणि वितरित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मात्र, राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. राज कुंद्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत मौन सोडले आहे.
यावेळी बोलताना तो म्हणाला की, “आजपर्यंत मी कोणत्याही पोर्नोग्राफीचा, कोणत्याही प्रॉडक्शनचा किंवा पॉर्नशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा भाग झालो नाही. हे आरोप समोर आल्यावर खूप वेदना झाल्या. त्यात तथ्य व पुरावे नसल्याने जामीनही मंजूर करण्यात आला. मला माहित आहे की मी काहीही चुकीचे केलेले नाही. जोपर्यंत ॲपचा संबंध आहे, ती माझ्या मुलाच्या नावावर एक सूचीबद्ध कंपनी होती. त्यावर आम्ही तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा पुरवायचो”.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लग्नानंतरची पहिली डेट, शेअर केले रोमँटिक फोटो, लूकने वेधलं लक्ष
राज कुंद्रा यांनी सांगितले की, त्यांनी त्या ॲपवर त्यांच्या भावजयच्या कंपनी केनरीनलाही सेवा दिली आहे. यामध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये चालवलेले ॲपही लॉन्च केले. हे ॲप्लिकेशन प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलं होतं. यांत ए-रेट केलेले चित्रपट होते, परंतु अश्लीलता अजिबात नव्हती. त्याच्या सहभागाच्या प्रश्नावर राज कुंद्रा म्हणाले की, “मी फक्त एक तंत्रज्ञान प्रदाता आहे. एक मुलगी पुढे येऊन सांगुदे की ती राज कुंद्राला भेटली आहे किंवा त्याच्या एखाद्या चित्रपटात काम केले आहे किंवा राज कुंद्रा अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करतो. सर्वत्र असं बोललं जात की, राज कुंद्रा सर्व १३ ॲप्सचा मास्टरमाइंड आहे, मी फक्त सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाशी संबंधित काम करतो आणि त्या ॲपमध्ये काहीही चुकीचे झाले नाही”.
आणखी वाचा – उर्फी जावेदला माहित नाही झाकीर हुसेन कोण?, प्रश्न विचारताच उत्तर देणं टाळलं, नेटकऱ्यांकडून ट्रोल
राज कुंद्रानेही शिल्पा शेट्टीबद्दल भाष्य केले आहे. पत्नीला या प्रकरणात ओढू नये, असे तो म्हणाला. या अभिनेत्रीने तिच्या मेहनतीने स्वत:चे नाव कमावले आहे. मीडिया मुद्दाम अभिनेत्रीचे नाव समाविष्ट करते, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते. राज कुंद्रा म्हणाला, “तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला बोला . पण या सगळ्यात त्याच्या कुटुंबाला ओढता कामा नये”.