वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी वैष्णवी हगवणेने आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवलं. सध्या वैष्णवी प्रकरण सर्वत्र चर्चेत आलं आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार असणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे तिच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवस फरार होते, मात्र पोलिसांना सापळा रचून त्यांच्या मुसक्या बांधण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, सासरच्या छळाबाबत दोन्ही सूनांनी तक्रारही केली होती मात्र त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे राजकीय क्षेत्रात कनेक्शन असल्याने त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही. (Hagawane Family Work Profile)
घरची परिस्थिती चांगली असूनही हगवण्यांच्या सूनेवर आत्महत्या करण्याची वेळ का आली, असा सवाल केला जात आहे. हगवणेंच्या घरचे शिकले सवरलेले असतानाही सूनांची होणारी मारहाण, शिवीगाळ या त्यांच्या विकृतीचा काहीच अंदाज बांधता येत नाही आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर त्यांचे खरे चेहरे समोर आले. हे आरोपी व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. तरीदेखील पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी दोन्ही सूनांचा छळ करत त्यांचे नाकीनऊ आणले. याच पार्श्वभूमीवर हगवणे कुटुंब कोणता कामधंदा करायचे याबाबत जाणून घेऊयात…
वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे हे सूनेच्या आत्महत्येनंतर सात दिवस फरार होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीचा सभासद होते. त्यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरुन मुळशी येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेच्या शरद ढमाले यांनी जास्त मत मिळवत त्यांना पराभूत केले. यावेळी त्यांना ६१ हजारांहून अधिक मत मिळाली होती.

तर वैष्णवी हगवणे हिचे दीर सुशील हगवणे हा युवक राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता.
तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे ज्यावर विश्वास ठेवून तिने हगवनेंच्या घराचा उंबरठा ओलांडला मात्र हा विश्वास त्याने सफल ठरू दिला नाही. लग्नाच्या काही दिवसांतच त्याने स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. तो वॉशिंग मशीन, पोकलेन मशीन आणि इतर व्यवसाय सांभाळायचा.
तर वैष्णवी हगवणे आणि तिची सासू लता हगवणे गृहिणी म्हणून काम सांभाळत होत्या.
या सर्व प्रकरणात व्हिलन म्हणून समोर आलेली वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा हात असल्याचं कानावर आलं. सासू-सासरे, दीर, पती यांना फिरवण्यात तिची नणंद करिष्मा हिचा वरदहस्त होता. तसेच दोन्ही भावजयांना करिष्माने मारहाण आणि शिवीगाळही केली आहे. करिष्मा ही पेशाने फॅशन डिझाइनर आहे.