Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले… सोशल मीडिया हे माध्यम सगळ्याच वयोगटात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. या माध्यमाद्वारे प्रेक्षकवर्ग जागृक होतानाही दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ प्रेक्षकांचं मनोरंजन करतात शिवाय त्यांना आशयघन कथानकाबाबतही जागृक करतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही व्हिडीओ त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करतात. तर काही किळसवाणे व्हिडीओ हे माध्यम वापरावे की नाही याबाबत प्रश्न निर्माण करतात. बरेच संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच सोशल मीडियावर एक कौटुंबिक वादाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
नवरा-बायको आणि दोन मुले एकत्र जात असताना त्या जोडप्यामध्ये भांडण होते आणि हे भांडण मारामारी पर्यंत पोहोचते. या व्हिडीओमध्ये भररस्त्यात नवरा त्याच्या पत्नीला मारताना दिसत आहे. तर पत्नीच्या कडेवर असणार बाळ रडून आक्रोश करताना दिसत आहे. पत्नी शेवटी हतबल होऊन त्या कडेवरच्या बाळाला खाली फेकून देते आणि रस्त्यावर चालू लागते. पती-पत्नीच्या भांडणामुळे त्या निरागस लेकरांची फरफट होतेय हे देखील त्या जोडप्याला कळत नाही आहे. आई-वडिलांच्या भांडांमध्ये त्या मुलांचे होणारे हाल या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – ‘चला येऊ द्या फेम’ अभिनेत्याचा मोठा निर्णय, पत्नीसह अवयवदान करणार, चाहत्यांकडून कौतुक
सदर व्हिडीओ पाहून नवऱ्यासह त्या आईची चुकीला नेटकऱ्यांनी बोल लगावले आहेत. आईने स्वतःच्या कडेवरच्या बाळाला फेकलं ही कृती पाहून कोणालाही धक्का बसेल. त्यांच्या भांडण्यात त्या निरागस बाळाचा काय दोष. शेवटी तो बापच त्या फेकलेल्या बाळाला उचलतो आणि जवळ घेतो. दोघं पालकांच्या भांडणात मुलांची झालेली ओढाताण त्यांना दिसली नसेल का पहिला प्रश्न व्हिडीओ पाहताच निर्माण झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या जोडप्याला चांगलंच बोल लागवताना दिसत आहेत.
Some people actually don't deserve to be a Parent:
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 20, 2025
pic.twitter.com/KDGrtAHW2s
आणखी वाचा – बाईक चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा टोमणा, म्हणाले, “त्यांना शिव्या घालू नका तर…”
पालकांची अशाप्रकारची वागणूक ही मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करते. मुलं त्यांच्या पालकांकडे लक्ष देत नाहीत. सततच्या भांडणामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. त्यांचे नैराश्य वाढत जाते. कालांतराने शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष लागत नाही. तर पालकांच्या भांडणामुळे ते मुलांनाही एकत्र वेळ देऊ शकत नाही.