‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शेर शिवराज’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आता भविष्यातही शिवकालीन चित्रपट येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. या चित्रपटांच्या यादीत ‘रावरंभा’ या चित्रपटाची भर पडणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटात स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित संघर्ष दाखवण्यात येणार आहे.(Om bhutkar new movie)
तर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अभिनेता शंतनू मोघे साकारनंतर असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. तर आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदुषित करण्यात आलं आहे. तर या पोस्टर मध्ये अभिनेत्री मोनालिसा बगल आणि अभिनेता ओम भुतकर दिसत आहेत. १२ मे २०२३ रोजी या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांची असून दिगदर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे.

वेडात दौडलेल्या सात वीरांची ही कथा येत्या १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मोठ्यापडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. शिव छत्रपतींच्या ज्वाज्वल्य इतिहासाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा बऱ्याच दिगदर्शकांचा प्रयत्न सध्या सुरु असलेला दिसतो. इतिहासावर निर्माण होणाऱ्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षक तेवढच प्रेम देताना सन्मान देताना दिसतात.(Om bhutkar new movie)
====
हे देखील वाचा- बिग बॉस मध्ये भांडणारे दोन खेळाडू दिसणार एकत्र ‘या’ सिरीज मध्ये दिसणार एकत्र
====
नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर मध्ये दिसणाऱ्या अभिनेता ओम भुतकर ने साकारकलेली मुळशी पॅटर्न या चित्रपटातील राहुल्या हि भूमिका चांगलीच गाजली होती. गेलेली शेती आणि त्यामुळे पेटलेले तरुण हे वास्तववाडी दृश्य ओम भुतकर ने राहुल्याची भूमिका साकारउन प्रेक्षकांचं मन जिंकलं होत.