सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भर मुलाखतीत मुकेश खन्ना भडकले, उपस्थितांना नको नको ते बोलले अन्…; नेटकरी म्हणाले, “जया बच्चनसारखे…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shaktimaan fame actor Mukesh Khanna angry and shouting at some people video viral on social media

मुकेश खन्ना लोकांवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय झालं?

शक्तिमान’ हा ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो होता. ‘शक्तिमान’च्या रुपाने भारतीयांना पहिला सुपरहिरो मिळाला. ९० च्या दशकातील लहानग्यांमध्ये या शोची प्रचंड क्रेझ होती. काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या शोची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. १९ वर्षानंतर शक्तिमान शो परतणार अशी त्यांनी घोषणा केली होती. पण काही कारणामुळे चाहते मंडळी या शोवर आणि मुकेश खन्ना यांच्यावर नाराज आहेत. अशातच आता या नाराजीमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mukesh Khanna Angry)

मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हायरल व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना काही लोकांवर ओरडताना दिसत आहेत. मुकेश खन्ना पत्रकारांना उत्तरे देत असताना कुणी तरी बोलत असतं आणि त्यांच्यामुळे मुकेश खन्ना वैतागून त्यांच्यावर ओरडतात. यावेळी ते असं म्हणतात की, “आपण का बोलत आहात? तुम्ही लोक कितीही वरिष्ठ असाल पण मी इथे बोलत असताना तुम्ही का बोलत आहात? शांत बसा, तुम्ही मला इथे बोलायला बोलावलं आहे. मग तुम्ही ऐकत का नाही आहात? जे बोलायचे आहे ते बाहेर जाऊन बोला”.

View this post on Instagram

A post shared by Filmy Mehul (@filmymehul)

आणखी वाचा – चित्रपटगृहांनंतर विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ आता ‘या’ ओटीटी माध्यमावर येणार, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तसंच काहींनी मुकेश खन्ना यांच्या या वागणूकीबद्दलची तुलना जया बच्चन यांच्याबरोबर केली आहे. मुकेश खन्ना यांची तुलना जया बच्चनशी केली कारण जया बच्चन अशा विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. “जया बच्चन तुम्ही शक्तीमानच्या पोशाखात आहात का?” अशी मिश्किल टिपणी नेटकऱ्याने केली आहे. तर आणखी एकाने “शक्तीमान किलविशसारखा का वागत आहे?” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “तो कॅफेमध्येही काम करायचा तेव्हा…”, रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर मृणाल दुसानिसला आठवले नवऱ्याचे जुने दिवस, म्हणाली, “आम्हा दोघांना…”

तसंच एकाने मुकेश खन्ना यांनी “म्हातारा माणूस” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने जया बच्चन व कंगणा रनौत यांचे मिळून मुकेश खन्ना होतात” असं म्हटलं आहे. एकूणच मुकेश खन्ना यांचा हा स्वभाव नेटकऱ्यांना आवडला नसून तशा अनेक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, शक्तिमानच्या नवीन सीझनचा पहिला भाग ११ नोव्हेंबर रोजी मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.

Tags: Mukesh Khanna AngryMukesh Khanna Marathi NewsShaktimaan Fame Mukesh Khanna
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
budgetfriendly gadgets

स्त्रियांसाठी अत्याधुनिक गृहपयोगी वस्तू फक्त १० रुपयांपासून मिळणार, स्वयंपाकघरातील वेळही वाचणार, पाहा संपूर्ण व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.