Home न्यूज मनोरंजनाची मीडियम Spicy मेजवानी येतेय भेटीला..

मनोरंजनाची मीडियम Spicy मेजवानी येतेय भेटीला..

0
SHARE
medium spicy ItsMajja

‘साधा की BadBoy’, ‘अबोल की Outspoken’, ‘Bold की सोज्वळ’, असं लिहीलेले पोस्ट, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत होते. नेमकी काय असेल याचा अंदाज लावेपर्यंत सईने ‘मीडियम स्पायसी’ नावाच्या चित्रपटाचं पोस्टर रिव्हिल केलं आहे.
या चित्रपटात सई, ललित आणि पर्ण हे नवं त्रिकुट पाहायाला मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर बघता जेवणाशी संबंधित काहीतरी गोष्ट असेल, आणि तसंच काहीसं हे कलाकार शिजवणार असल्याचा अंदाज बांधायला हरकत नाही. या चित्रपटाची प्रस्तुती ‘Landmarc Films’ ने केली असुन ‘मोहित टकालकर’ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे, तसेच ‘विधी कसलीवाल’ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत खावंसं तर वाटतचं पण मनोरंजनातही खास मेजवानी पाहायला मिळाली तर बात काही औरच असते. अशीच मज्जेदार मेजवानी चित्रपटाच्या रुपात सई, ललित आणि पर्ण घेऊन येत आहेत. नेमका सिनेमा कधी येणार हे अजुन गुलदस्त्यात आहे पण मनोरंजनाची भुक भागवणारा हा चित्रपट नक्कीच असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here