Home न्यूज Badla Movie Review : अमिताभ बच्चन चा अजून एक सिक्सर

Badla Movie Review : अमिताभ बच्चन चा अजून एक सिक्सर

0
SHARE
Badal Movie Review

ह्या शुक्रवारी म्हणजे ८ मार्च ला बहुचर्चित असा बदला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2017 चा स्पॅनिश चित्रपट द इनव्हिजिबल गेस्टचा हा मूळ चित्रपट आहे.

कथा घडते स्कॉटलँड मध्ये बदला हि व्यावसायिक स्त्री नैना सेठी (तापसी पन्नू) हिची गोष्ट आहे जी मृतदेह असलेल्या हॉटेलच्या खोलीत सापडते. पण तिच्या मते हा खून तिने केला नाहीये आणि त्या हॉटेलच्या खोलीत कोणीही आल्याचा पुरावा मिळत नाही. ह्या सर्व अडचणीतून तिला बाहेर काढण्यासाठी बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) तिची मदत करतो. बादल गुप्ता हा वकील त्याच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत एकही केस हरलेला नसतो. आणि तो नैना ला ह्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.

बहुतांश चित्रपट हा एका रूम मध्ये घडत असतो. दोन्ही व्यक्तिरेखा म्हणजे बादल आणि नैना हे प्रेक्षकांचे मानसिक आणि शारीरिक स्थलांतर करण्यात यशस्वी होतात. अमिताभ आणि तापसी ची उत्तम केमिस्ट्री आपल्याला ह्या चित्रपटातही दिसून येते. यापूर्वी आलेल्या पिंक चित्रपटात दोघांनी उत्तम काम करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

चित्रपटामध्ये एक सरप्राईझ पॅकेज असणार आहे हे म्हणजे राणी च्या भूमिकेत (अमृता सिंग). रोल छोटा आहे पण त्याच्या प्रभाव संपूर्ण चित्रपट आपल्याला दिसत राहतो.

नाट्यमय थ्रिलरसाठी शब्दांची पकड मजबूत असणे खूप आवश्यक असते आणि तेच सुजोय घोष दिग्दर्शित बदला ह्या चित्रपटात आपल्याला दिसून येते.
कलाकारांच्या अभिनयाविषयी बोलायचं झालं तर प्रत्येकानेच उत्तम काम केले आहे. परंतु अमृता सिंग ची भूमिका हि तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे शेवट पर्यंत लक्षात राहते.

शेवटी बोलायचं तर , बदला हा थ्रिलरपट शेवट पर्यंत तुम्हाला खिळवून ठेवण्यात यशस्वी राहतो. चित्रपटाचा वेग आणि वळण तुम्हाला कुठेच बोर करणार नाही. तुमचा विकेंड जर तुम्हाला मस्त घालवायचा असेल तर बदला एकदा तरी थिएटर मध्ये बघायला काहीच हरकत नाही.सुजॉय घोष च्या बदला चित्रपटाला मी देतोय ४ स्टार्स.

Review By: Salil Arunkumar Sand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here