‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो पैकी एक आहे. या शोमधील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना बांधून ठेवलं आहे. (Chenata bhat with husband)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने काही कालावधी साठी ब्रेक घेतला होता, त्यामुळे सगळेच प्रेक्षक या कार्यक्रमाला मिस करत होते. ब्रेक घेऊन ही कलाकार मंडळी परदेश दौरा करण्यात व्यस्त होती. हास्यजत्रेतील विनोदवीर अमेरिकेतील त्यांच्या विनोदाच्या झटक्याने हसवायला सज्ज झाले होते. अमेरिका दौऱ्या दरम्यानचे अनेक शोज ही त्यांचे हाऊसफुल्ल झाले, तेथील अनेक फोटो व्हिडिओस कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट केले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील हास्यवीर आता मोठ्या कालावधी नंतर परदेश दौऱ्यावरून परतले आहेत.
पाहा चेतनाचा भावुक व्हिडीओ (Chenata bhat with husband)
प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करणारे हे कलाकार बऱ्याच वेळाने घरी परतले आहेत, एअरपोर्ट वर आल्यावर कुटुंबातील सदस्य त्यांना घ्यायला आले होते. दरम्यान अभिनेत्री चेतना भट ही भावुक झालेली पाहायला मिळाली. चेतना भट हिचा पती मंदार चोळकर तिला एअरपोर्ट वर घ्यायला आला होता, मंदारला पाहताच चेतनाने तिला घट्ट मिठी मारली, आणि बऱ्याच दिवसानी भेटल्याने तिला अश्रू देखील अनावर झाले. चला तर पाहुयात चेतनाचा हा भावुक व्हिडीओ.
हे देखील वाचा – ‘ठरलं तर मग’च्या अमितला चाहत्यांनी ओळखलंच नाही, लोकल ट्रेनने प्रवास करताना फोटो शेअर करत म्हणाला, ‘मी त्यांना डुप्लिकेट..’
चेतनाचं भुवई उंचवून समीर चौगुलेची मुलगी होण्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये फेमस आहे. चेतना सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते, ती तिचे व तिच्या पतीचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच चेतना साठी तिच्या नवऱ्याने खास सरप्राईज गिफ्ट देखील दिल होतं. प्राजक्ता माळीच्या प्राजक्तराज चे काही खास अलंकार त्याने चेतनाला गिफ्ट म्हणून दिले होते.
