Home टी व्ही Tula Pahate Re मध्ये विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा

Tula Pahate Re मध्ये विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा

0
SHARE
Tula Pahate Re मध्ये विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा

“अरे Tula Pahate Re मध्ये काही होत नाही यार”,”गोष्ट पुढेच जात नाहीये”,”पकाव सिरीयल आहे” असे बोलणाऱ्या प्रेक्षकांना आता एक नवीन ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. झी मराठी ने एक छोटा इंटरेस्टिंग प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सगळ्यांना सांभाळून घेणारा,प्रेमळ,बिझनेस मॅन दाखवलेला विक्रांत सरंजामे चा नवीन अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे.

नक्की हे खर आहे कि प्लॅन..? इशा शी लग्न करणं हा विक्रांत चा डाव होता का..? जालिंदर सांगत होता ते खर होतं का..? असे प्रश्न तुमच्या डोक्यात फिरत असतील तर त्याची सगळी उत्तर तुम्हाला Tula Pahate Re च्या येणाऱ्या भागात बघायला मिळेल.

छोट्या पडद्यावर सध्या ‘Tula Pahate Re’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here