Home टी व्ही Tula Pahate Re मधील विकिशाचे हळद आणि संगीत समारंभातील लुकची खास झलक

Tula Pahate Re मधील विकिशाचे हळद आणि संगीत समारंभातील लुकची खास झलक

0
SHARE
Tula Pahate Re मधील विकिशाचे हळद आणि संगीत समारंभातील लुकची खास झलक

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. मोठमोठ्या कलाकारांच्या दिमाखदार आणि भव्य लग्नसोहळ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत विकिशा म्हणजेच Tula Pahate Re मधील विक्रांत आणि ईशाच्या शाही लग्नसोहळ्याचे. विक्रांत आणि ईशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. यावर्षात हे पाहिलंच शाही लग्न आहे ज्याची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणी देखील एका वेगळ्याच पद्धतीने घातली, त्यामुळे त्यांचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडणार आहेत. या मालिकेच्या चाहत्यांसाठी विकिशाच्या हळद समारंभातील ईशाचा तसंच त्यांच्या संगीत समारंभातील विक्रांतच्या शाही लुकची खास झलक. विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकिशाच्या लग्नाचा मुहूर्त चुकवू नका १३ जानेवारी संध्याकाळी Tula Pahate Re ७ वाजता फक्त झी मराठीवर.

Tula Pahate Re itsmajja

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here