Home टी व्ही Tula Pahate Re मध्ये सुरु झाली ईशा-विक्रांतची लगीनघाई

Tula Pahate Re मध्ये सुरु झाली ईशा-विक्रांतची लगीनघाई

0
SHARE
Tula Pahate Re मध्ये सुरु झाली ईशा-विक्रांतची लगीनघाई

अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे.Tula Pahate Re मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे.विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली Tula Pahate Re मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. इशा आणि विक्रांत ह्यांचे प्रेम निमकरांना मान्य नव्हते. परंतु आता विक्रांत च्या आई साहेबानी आणि विक्रांत ने त्याचे इशा वर किती प्रेम आहे हे निमकराना पटवून दिले आणि शेवटी हिरोईन चे बाबा मान्य झालेच. गेल्या भागात इशा आणि विक्रांत च्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सरंजामे कुटुंब निमकरांच्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते आणि बघता बघता हि प्रेम कहाणी आता नवीन वळण घेणार हे दिसून येत आहे.

झी मराठी ने रिलीज केलेल्या टिझर नुसार आता इशा आणि विक्रांत मंगळसूत्र खरेदी साठी जाणार आहे. विक्रांतची मागणी घालण्याची पद्धत हटके आणि रोमांचक होती आता लग्न तो कोणत्या हटके पद्धतीने करतोय ह्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here