Home ट्रेलर ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

0
SHARE
Thackeray itsmajja

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला.नवाजुद्दीन सिद्दीकी ने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे तसेच अम्रिता राव हि अभिनेत्री बाळासाहेबांच्या पत्नी च्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुळातच खूप मुरलेला अभिनेता आहे. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना लक्षात राहते. छोट्या छोट्या भूमिका देखील तो तेवढ्याच हिमतीने आणि तेवढ्याच बहारदारपणे प्रेक्षकांच्या समोर आणतो. ट्रेलर बघता नवाजुद्दीन सिद्दीकी ने नक्कीच कमालीचा अभिनय केलाय ह्यात काही शंका नाही. चित्रपट २५ जानेवारी ला हिंदी आणि मराठी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही वर्षात बऱ्याच बायोपिक येऊन गेल्या आणि त्यातला काही बऱ्याच गाजल्या. एखाद्या बायोपिक मध्ये काम करणं आणि महत्वपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने निभावणं हे महत्वाचं असतं. बाळासाहेब ठाकरे ह्यांचा जीवनप्रवास आपल्याला खूप काही शिकवून गेला आणि तो मोठ्या पडद्यावर उतरवण्यात धाडस दिग्दर्शक अभिजित पेनसे ह्याने केले आहे.

कंगना राणावत चा मणिकर्णिका आणि ठाकरे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. दोन्ही मोठे चित्रपट एकत्र आल्यामुळे प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचं मस्त गिफ्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही .

English Summary

The trailer of Nawazuddin Siddiqui starrer Thackeray is out. The film is a biopic based on the life of Shiv Sena supremo Balasaheb Thackeray. The film also stars Amrita Rao in the role of Thackeray’s wife.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here