Home न्यूज Teaser Review: Kalank – सेट ते बॅकग्राउंड स्कोअरपर्यंत प्रेक्षकांना भारावून सोडणारा टिझर

Teaser Review: Kalank – सेट ते बॅकग्राउंड स्कोअरपर्यंत प्रेक्षकांना भारावून सोडणारा टिझर

0
SHARE
Teaser Review: Kalank

कलंक चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी अखेर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आणि हे म्हणायला हरकत नाही कि चित्रपटाचा टिझर बघताना प्रत्येक व्यक्ती ने आ वासला असेल. चित्रपटाचा सेट ते कास्ट बॅकग्राउंड स्कोअरपर्यंत, कलंक टीझर ने प्रेक्षकांना भारावून सोडले आहे.

निर्मात्यांनी कलंक टीझर लॉन्च करण्याआधी, या चित्रपटातील पात्रांचे पोस्टर लाँच करून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आणि ह्या टिझर ने तर चित्रपट कधी एकदा चित्रपटगृहात येतोय ह्याची हवा सोशल मीडियावर केली.

दोन मिनिटांच्या लांब टीझर आपल्याला शेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवतो. कारण ते आपल्याला सहा वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवनात घेऊन जाते आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे दर्शविते. पॉवर-पॅक्ड संवादांमधून चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ठसठशीत दिसते.

(Student Of The Year – 2012, Humpty Sharma Ki Dulhania – 2014 and Badrinath Ki Dulhania – 2017) ह्या चित्रपटानंतर मोठ्या स्क्रीनवर वरुण धवन आणि आलिया भट्ट एकत्र दिसतील.खरं तर, 21 वर्षानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त देखील ह्या चित्रपटातून नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

१९४० मधला काळ कलंक चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वरमन ने केले आहे. टिझर नंतर ह्या चित्रपटाचा ट्रेलर आणि संपूर्ण चित्रपट कधी येतोय ह्याची मी पण वाट बघतेय.

निर्माता करण जौहरसाठी, कलांकला एक प्रचंड भावनात्मक जोड आहे कारण हाच तो चित्रपट होता जो त्याचे वडील यश जोहर बनवू इच्छित होते. तसेच, धर्मा प्रोडक्शन्सने पहिल्यांदाच ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. टिझर बघता त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होईल ह्यात काहीच शंका नाही.

कलंक चित्रपटात बेगम म्हणून माधुरी दीक्षित,सत्या चौधरी म्हणून सोनाक्षी सिन्हा,आलिया भट्ट रूप च्या भूमिकेत ,वरुण धवन जफर म्हणून,आदित्य रॉय कपूर देव चौधरी च्या भूमिकेत आणि संजय दत्त बलराज चौधरी च्या भूमिकेत दिसणार आहेत. कुणाल खेमू, हितेन तेजवाणी, किरा अडवाणी आणि क्रिती सॅनन सारखेकलाकार देखील ह्या चित्रपटाचा भाग असणार आहे. कलंक हा चित्रपट १७ एप्रिल २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here