Home न्यूज Sur Sapata चे रंग भारी रे गाणं प्रदर्शित

Sur Sapata चे रंग भारी रे गाणं प्रदर्शित

0
SHARE
Sur Sapata चे रंग भारी रे गाणं प्रदर्शित

गावखेड्यातल्या नदीकाठच्या निसर्गसौंदर्य धरतीवर काही मुलांचा खेळ रंगला आहे. ‘रंग भारी रे रंगणार’ म्हणत रंगलेला हा कबड्डीचा खेळ आणि सोबतच रंगपंचमीच्या रंगांची उधळण पाहताना रसिकही त्यात समरसून जातील यात काही शंका नाही. ‘Sur Sapata’ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आत्ता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घातली आहे.’Sur Sapata’मधील ‘रंग भारी रे… रंगणार’ हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारं झालं आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे.

लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित’Sur Sapata’ २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ‘रंग भारी रे.. रंगणार’ या गण्याची खास झलक प्रेक्षकांना सध्या युट्युबवर पाहता येईल. कबड्डी खेळावर आधारलेला हा चित्रपट मनोरंजक असून बऱ्याच काळानंतर मराठीत असा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात असलेला मराठीतील दिग्ग्ज कलावंताचा ताफा. दिग्दर्शक संजय जाधव, उपेंद्र लिमये, अभिज्ञा भावे ही त्यातली काही नावं जी अलीकडेच उलगडण्यात आली आहेत. शिवाय उनाड पण कुशल कबड्डीपटूंच्या भूमिकेतील हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, सुयश शिर्के, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘Sur Sapata’मध्ये आपल्याला पहायला मिळतील.

प्रकाश नाथन, हिमांशू आशेर, संजय पतोडीया,अर्शद कमल खान प्रस्तुत, किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘Sur Sapata’ची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफी विजय मिश्रा यांचे आहे. २२ मार्चला ‘Sur Sapata’ चा रोमांचकारी खेळ चित्रपटगृहांत रंगणार असून तत्पूर्वी ‘रंग भारी रे… रंगणार’ या गाण्यात प्रेक्षक रंगतील यात काही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here