Home न्यूज ब्लॅक अँड व्हाईट च्या प्रेमात स्पृहा

ब्लॅक अँड व्हाईट च्या प्रेमात स्पृहा

0
SHARE
ब्लॅक अँड व्हाईट च्या प्रेमात स्पृहा

मायबाप,मोरया,सूर राहूदे,अ पेयिंग गोस्ट,पैसा पैसा,बायोस्कोप, लॉस्ट अँड फाउंड, मला काहीच प्रॉब्लेम नाही,होम स्वीट होम ह्यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे वेगवेगळे रंग दाखवणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. चित्रपटा व्यतिरिक्त स्पृहा नाटक,मालिका यामाध्यमांतून देखील प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करते. डोन्ट वरी बी हॅप्पी ह्या तिच्यानाटकाने रसिक प्रेक्षकांवर जणू जादूच केली. अग्निहोत्र,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट,उंच माझा झोका ह्या गाजलेल्या मालिकांमध्येही वेगवेगळ्या भूमिका साकारत स्पृहाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

स्पृहा एक उत्तम अभिनेत्री आहेच हे सर्वाना माहित आहे परंतु स्पृहा तितक्याच चांगल्या कविता करते. डबल सीट चित्रपटातील किती सांगायचंय मला ह्या गाण्याचे लिरिक्स हे स्पृहाचे आहेत त्याचसोबत लॉस्ट अँड फाउंड चित्रपटातील आस हि नवी आणि सांग ना ह्या गाण्यांचे शब्द देखील स्पृहा ने लिहिले आहेत. जस मी आधी सांगितलं कि स्पृहा उत्तम कविता करते आणि त्याच कवितांची एक खास झलक तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर बघायला मिळते. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काढलेले सुंदर फोटोस आणि त्यावर साजेशी छोटी कविता. प्रत्येक कविता वाचता वाह असे बोलल्या वाचून राहणार नाही.

सूर्य वितळतो लाटांमध्ये
रंग जातात समुद्रात विरघळून,
आभाळभर उरतो फक्त काळा रंग..
मला राहून राहून वाटत राहतं,
तसाच माझ्यात जाशील का तू, कधीतरी पार बुडून..!?
– स्पृहा

अश्या सुंदर कविता आणि तितकेच सुंदर फोटो :

अश्याच सुंदर कविता वाचायच्या असतील तर स्पृहा जोशींच्या सोशल मीडिया अकाउंट ला नक्की भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here