Home नाटक ‘शर्मन जोशी’ची मराठीत एन्ट्री

‘शर्मन जोशी’ची मराठीत एन्ट्री

0
SHARE

बॉलिवूड स्टार ‘शर्मन जोशी’ याने ‘गोलमाल’, ‘स्टाईल’, ‘3 इडियट्स’, सारख्या हिंदी चित्रपटात काम करुन, प्रेक्षकांचं खुप मनोरंजन केलं आहे. पण आता तो अभिनयाच्या पलीकडेही एक पाऊल पुढे जाणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक ‘केदार शिंदे’ ज्याने आजपर्यंत अनेक अजरामर नाटकं लिहीली, प्रेक्षकांच्या भेटीला आणली तोच केदार शिंदे आज तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी रंगभुमीकडे वळला आहे.

केदारने आजपर्यंत ‘तु तु मी मी’, ‘सही रे सही’, ‘लोचा झाला रे’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, यासारखी दर्जेदार नाटकं दिग्दर्शित केली आणि आता ‘वाजले की बारा’ हे नाटक तो घेऊन येणार आहे. या नाटकाबद्दल विशेष म्हणजे या नाटकाची निर्मिती हिंदी सिनेअभिनेता ‘शर्मन जोशी’ करणार आहे. ‘The Play That Goes Wrong’ या लंडन- अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचा हा अधिकृत रिमेक असणार आहे. याआधी या नाटकाचा रिमेक गुजराती आणि इंग्रजी भाषेत केदार आणि शर्मनने केला आहे, मराठीत प्रथमच या नाटकाचा रिमेक केला जाणार आहे. ब्रॉडवेचं नाटक मराठीत सादर करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

शर्मनला माहित आहे की मराठी प्रेक्षक हा नाटकाचा भुकेला आहे, आणि त्याला स्वत:ला देखील नाटक, रंगभूमीवर प्रेम आहे म्हणून त्याने मराठीत नाट्यनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यात त्याला केदार सारख्य़ा हरहून्नरी दिग्दर्शकाची साथ मिळाली म्हणजे नाटक सुपर डुपर हिट होणारच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here