Home मुव्ही रिव्ह्यू सविता दामोदर परांजपे : एक वेगळा अनुभव

सविता दामोदर परांजपे : एक वेगळा अनुभव

0
SHARE
सविता दामोदर परांजपे : एक वेगळा अनुभव

सविता दामोदर परांजपे ह्या चित्रपटाची टीम आज अखेर चित्रपटगृहात आपले मनोरंजन करायला तयार आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. मधुकर तोरडमल आणि रीमा लागू ह्यांनी एकेकाळी हे नाटक खूप मोठ्या प्रमाणावर गाजवलं. आणि आता त्या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करण्याचे धाडस दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी ह्यांनी केले आहे.

शरद अभ्यंकर आणि कुसुम अभ्यंकर ह्या दाम्पत्यांची हि कथा. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोघे आपल्या संसारात सुखी आहेत परंतु येथे दृष्ट लागण्यासारखा एक डाग आहे तो म्हणजे कुसूमचे आजारपण. कुसुमला रोज होणारी पोटदुखी हे शरद च्या चिंतेचे कारण आहे. अनेक डॉक्टर्स आणि वैद्य करूनही कुसुम मात्र त्याच आजाराशी झुरत आहे. टीआयएफआर असूनही आध्यात्मावर विश्वास असलेला अशोक शरद आणि कुसुमच्या वाढदिवसाच्या वेळी त्यांची घरी येतो आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात होते. अशोक कुसुम ला पाहताच क्षणी ओळखतो कि तीच दुखणं हे शारीरिक नाही. तिचा हात बघून कुसुमच्या आजारपणाचा खरं कारण त्याला समजते.

आता हि सविता दामोदर परांजपे कोण आहे..? कुसुमच्या आजाराचं नक्की कारण काय..?अशोक आणि शरद नक्की ह्या आजारावर काय उपाय शोधतात ह्या सर प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील सविता दामोदर परांजपे ह्या चित्रपटात.

सुबोध भावे,तृप्ती तोरडमल,राकेश बापट,पल्लवी पाटील,अंगद म्हसकर, हेमांगी कवी आणि सविता प्रभुणे अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला ह्या चित्रपटात बघायला मिळते. ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल ह्यांनी कन्या म्हणजे तृप्ती. सविता दामोदर परांजपे ह्या चित्रपटाद्वारे तृप्तीने मराठी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल ठेवले आहे. सुंदर दिसणारी हि अभिनेत्री अभिनयातही तितकीच सरस आहे हे चित्रपट बघून कळते. राकेश बापट,पल्लवी पाटील आणि अंगद म्हसकर ह्यांच्या भूमिका देखील उत्तम झाल्या आहेत. थोड्या वेळासाठी दिसलेल्या सविता प्रभुणे देखील नेहमीप्रमाणे आपला अभिनय दमदारपणे उमटवतात. आणि आता शरद अभ्यंकर ची भूमिका ज्याने चोख पार पडली तो अभिनेता म्हणजे सुबोध भावे. एका लेखकाची भूमिका पार पडताना सुबोध कुठेही कमी पडत नाही. एक प्रसिद्ध लेखक,अतोनात प्रेम करणारा नवरा,सांभाळून घेणारा भाऊ ह्या सर्व भूमिका निभावताना हा रोल फक्त त्याच्यासाठी आहे हे त्याने दाखवून दिले.

चित्रपटाची गाणी देखील उत्तम झाली आहे. स्वप्नील बांदोडकर च्या आवाजातील जादूगिरी हे गाणे मनात घर करून जाते. चित्रपट बघून सुबोध भावे चा अभिनय,चित्रपटाची गाणी तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहतील.

दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी ह्यांच्या सविता दामोदर परांजपे ला itsmajja.com तर्फे ३ स्टार्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here