Home टी व्ही ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आज संजय मोने

‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आज संजय मोने

0
SHARE
‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आज संजय मोने

असं म्हणतात कि माणसाच्या हृदयाचा रास्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्नात गृहिणी असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ नित्य नियमाने करत आहे. आम्ही सारे खवय्येचा हा लज्जतदार प्रवास नुकताच ३००० भागांचा झाला. २०१८ हे वर्ष आता संपून नवीन वर्षाचे वेध सगळ्यांना लागले आहेत. ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करून या वर्षाला निरोप देण्याची जणू काही प्रथाच आहे आणि या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये एक खास पाहुणा येणार आहे.

कानाला खडा या कार्यक्रमातून सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारणारे सगळ्यांचे लाडके निवेदक अभिनेता संजय मोने आम्ही सारे खवय्येच्या किचन मध्ये त्यांचं पाककौशल्य दाखवणार आहेत. ३१ डिसेंबर सेलिब्रेशनच्या निमित्ताने हा विशेष एपिसोड प्रसारित होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि संजय मोने यांच्यासोबत गप्पा रंगणार आहेत. तसंच गप्पा आणि खाणं यांची मैफिल रंगणार आहे. त्यामुळे हा विशेष भाग पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये आज दुपारी १.३० वाजता झी मराठीवर!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here