Home टी व्ही वच्छीच्या जाळ्यात अडकणार का सरिता?

वच्छीच्या जाळ्यात अडकणार का सरिता?

0
SHARE
Ratris Khel Chale itsmajja

भय भीती ही प्रत्येक माणसाची दुखरी नस असते आणि तीच संधी झी मराठी वहिनीने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून साधली आहे. अण्णा नाईकांची दहशत पूर्ण गावभर आहे, पण अण्णा कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा मानत नाही.

रात्रीस खेळ चालेच्या कालच्या भागात अभिराम पाण्यात पडतो असं पांडू नाईकांच्या वाड्यावर सांगत येतो. नाईकांना पाणी बादतं आणि त्याची प्रचिती अभिराम पाण्यात जाऊन आली. दत्ताची बायको सरिता जेव्हा पासून घरी आली आहे, नवी नवरी म्हणून एकही दिवस तिने नाईकांच्या वाड्यावर घालवला नाही. सरिता अगदी साधी भोळी आहे म्हणून तिने वच्छीच्या मुलाचा जीव वाचवा ती त्यांना जाऊन पैश्यांची मदत करते.

पण वच्छी सरिताच्या या भोळेपणाचा फायदा तर घेऊ पाहत नाहीये ना? अभिराम पाण्यात पडल्याने त्याची शुद्ध हरपते, कोणालाही काय करावे सुचत नाही. अशातच वच्छीची सून सरिताला १ अंगारा देते आणि सांगते की अभिरामच्या जवळ जेव्हा कोणी नसेल तेव्हा तू जाऊन तीन बोटं अंगाऱ्याची त्याच्या कपाळाला लाव, आणि कोणालाही या बद्दल बोलू नकोस.
सरिता तिचं ऐकते आणि संधी साधून त्याच्या कपाळाला अंगारा लावते. तितक्यातच अण्णा घरात येतात आणि अभिरामही शुद्धीवर येतो. शुद्धीवर येताच तो अण्णाकडे बघून राक्षस इलो असं म्हणतो. घरातल्यांना काही समजत नाही की तो असं काय बडबडतोय. वच्छीने दिलेल्या अंगाऱ्याने अभिरामला बरं वाटलं खरं पण अण्णाच्या जीवावर काही बेतनार आहे का? वच्छी सरिताच्या भोळेपणाचा गैरवापर करेल का? आणि नाईकांना अजून काय काय गोष्टींना सामोरे जावे लागणार या सगळ्यासाठी बघत राहा ‘रात्रीस खेळ चाले’ फक्त झी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here