Home टी व्ही अण्णा आणि नेने वकिलांत शेवंताने पाडली फूट

अण्णा आणि नेने वकिलांत शेवंताने पाडली फूट

0
SHARE

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत नेने वकिल शेवंताला त्यांच्या वकिलीचा धाक दाखवायला जातात, पण शेवंताच “माझे वडिल वकिल होते आणि त्यामुळे सरिताला मी माझ्याकडे ठेवलेलं आणि त्याबदल्यात पोलिस माझ्यावर गुन्हा दाखील करतील याची भीती मला नाही दाखवली तरच बरं होईल,” असं सागंते. नेने वकिल तिथून निघून जातात आणि रघू काकांना भेटतात आणि हल्ली अण्णांची आणि शेवंताची जवळीकता वाढली असल्याचं सांगतात.

अण्णांनी गोळी मारल्यापासुन काशी स्वत:ला अण्णा नाईकच समजतोय आणि तो तसंच वागतोय. पण त्याच्या या वेडेपणाची गावातली लोकं मजा घेत आहेत. असंच तो काठीला बंदूक समजून गावातल्या पोरांना गोळा करुन, “अण्णा नाईक असा मी माझ्या वाट्याक जाऊ नका”, असं सांगत असतो. इतकच नाही तर त्या पोरांना खोटे पैसे वाटत असतो. सोंट्या काशीला थोडे पैसे देतो आणि सांगतो गोळ्यांसाठी थोडे पैसे ठेव. तितक्यात एक मुलगा डोक्यावर टॉवेलचा पदर घेऊन शेवंताची नक्कल करतो. आणि काशीपण, “मका पण शेवंता होया”, असं बोलत तिच्या घराच्या दिशेने जातो.

तिथे शेवंताच्या घरी अण्णा जातात, पण शेवंता त्यांच्यावर रागावली असते, काहीही बोलत नाही. शेवटी राग अनावर होऊन अण्णा रागात तिचा हात पकडतात त्यावर, “आज तुम्ही पकडलात उद्या कोणी अजून पकडेल”, असं रागात बोलते. अण्णा तिला विचारतात कोणी पकडला सांग, हातचं मोडून टाकतो त्याचा. ते वारंवार तिला विचारत असतात की कोण आलेलं इथे सांग, शेवंता काहीतच सांगत नाही.

शेवटी न राहावून ती त्यांना सांगुन टाकते की, “नेने वकिल आले होते”. बसं, संपलं, अण्णांच्या रागाचा पारा चढतो ते तडक त्यांच्या अड्यावर जातात, तिथे रघूकाका आणि नेने दोघेही बसले असतात. अण्णा काचेची बाटली फोडतात आणि सरळ नेनेंच्या गळ्यापाशी धरतात. शेवंताच्या घरी गेल्यामुळे नेने वकिलांना जीव गमवावा लागेल का? मालिकेत पुढे काय होईल हे बघण्यासाठी पाहात राहा ‘रात्रीस खेळ चाले’ फक्त झी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here