Home नाटक अजरामर नाट्यकृती नटसम्राट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

अजरामर नाट्यकृती नटसम्राट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

0
SHARE
अजरामर नाट्यकृती नटसम्राट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनी प्रत्येकवेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि दर्जेदार घेऊन येत असते. ह्यावेळी देखील रसिकप्रेक्षकांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी एक गाजलेली कलाकृती एक अजरामर नाटक नटसम्राट पुन्हा एकदा नवीन रूपात प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

डॉ.श्रीराम लागू ह्यांच्या जिवंत अभिनयातून सजलेलं हे नाटक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या नंतर ह्या नाटकावर आधारित एक उत्कृष्ट चित्रपट बनविण्यात आला. त्यात मुख्य भूमिकेत नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकरांनी त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळवून दिला. महेश वामन मांजरेकर ह्यांनी नटसम्राट ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.नाटकावर आधारित ह्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. ज्या तरुणपढीने डॉ.श्रीराम लागू अभिनित हे अजरामर नाटक पाहिले नव्हते त्यांनी त्यांना तो काळ पुन्हा अनुभवण्याची संधी ह्या चित्रपटाने दिली. नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर ह्यांच्या सोबत ह्या चित्रपटात अजित परब,मृण्मयी देशपांडे,विक्रम गोखले,नेहा पेंडसे,सुनील बर्वे,जितेंद्र जोशी,संदीप पाठक,अनिकेत विश्वासराव हि स्टारकास्ट देखील आपल्यला बघायला मिळाली होती.

झी मराठी प्रस्तुत,एकदंत क्रिएशन्स निर्मित,वि.वा.शिरवाडकर लिखित आणि ह्रिषीकेश जोशी दिग्दर्शित नटसम्राट ह्या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ४ नोव्हेंबर दुपारी ४:३० वाजता कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे होणार आहे.
नेपथ्य :- प्रदीप मुळ्ये
संगीत :- नरेंद्र भिडे
वेशभूषा :- मृणाल देशपांडे
सुत्रधार :- गोट्या सावंत
निर्माता :- चंद्रकांत लोहकरे

मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आणि मोहन जोशी आपल्याला दिसणार आहे. यासोबतच सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेहेंदळे, शुभांकर तावडे, अभिजित झुंजारराव, मिलिंद अधिकारी, आशीर्वाद मराठे, सायली काजरोळकर, राम सईदपुरे हे कलाकार देखील आपल्याला बघायला मिळतील. नटसम्राट ह्या नाटकाचे ऑनलाईन बुकिंग जर तुम्हाला करायचे असतील तर येथे http://bit.ly/Natasamrat2018 क्लिक करा.

नाटकाचे पुढील प्रयोग :
६ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे , बोरिवली
७ नोव्हेंबर दुपारी ४:३० वाजता विष्णुदास भावे, वाशी
८ नोव्हेंबर रात्री ८ वाजता श्री शिवाजी मंदिर,दादर
९ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह,पार्ले
१० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर,पुणे
११ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण,पुणे
१६ नोव्हेंबर रात्री ८:३० वाजता गडकरी रंगायतन,ठाणे
१८ नोव्हेंबर दुपटी ४:३० वाजता आचार्य अत्रे,कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here