Home न्यूज मिका सिंग देतोय ‘Dokyala Shot’

मिका सिंग देतोय ‘Dokyala Shot’

0
SHARE
मिका सिंग देतोय 'Dokyala Shot'

‘Dokyala Shot’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या हटके नावावरून ह्या सिनेमात काहीतरी धमाकेदार आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की. चित्रपटाच्या ‘जोरू का गुलाम’ या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचे टायटल सॉंग प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे. आणि ते म्हणजे बॉलीवूड मध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘मिका सिंग’ याने हे ‘Dokyala Shot’ गाणे गायले आहे. तर मराठी मधील आघाडीचा संगीतकार अमितराज याने या गाण्याला संगीत दिले आहे.

ते म्हणतात ना, चित्रपटाची सुरुवातच धमाकेदार झाली पाहिजे त्यासाठी या चित्रपटाची सुरुवातच या गाण्याने होत आहे. त्यामुळे सुरुवातीचे गाणे जोशपूर्ण असावे, अशी उत्तुंग आणि शिवकुमार यांची इच्छा होती. पाहिले गाणे पाहूनच प्रेक्षकांना अंदाज आला पाहिजे, की ते पुढच्या दोन तासांत किती हसणार आहेत आणि त्यांना हा चित्रपट पाहताना किती मजा येणार आहे. या धमाकेदार सुरुवातीसाठी आवाज सुद्धा तसा भारदस्त पाहिजे होता. तेव्हा या चित्रपटाचे निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी मिका सिंग यांचे नाव संगीतकार अमितराज यांना सुचवले. अमितराज यांनी देखील या नावाला आनंदाने हो म्हणत हे गाणे मिका सिंग यांच्या आवाजात स्वरबद्ध केले. या गाण्यातून चार मुलांची एकमेकांशी असलेली घट्ट मैत्री अगदी स्पष्ट दिसून येत आहे. शिवाय सुव्रत, रोहित, ओमकार हे तिघे गणेश पंडित या त्यांच्या चौथ्या मित्राला किती त्रास देतात, हे अनेक दृश्यातून दिसते. चहा टपरीवर चहा पिताना, अंड खाली ठेऊन त्यावर त्याला बसवतात, बॅटने त्याला मारतात इतका त्रास देऊन पण गणेश पंडित न चिडता खिलाडू वृत्तीने त्या सर्व मजा मस्तीचा आनंद घेतो.

या गाण्याच्या निमित्ताने मिका सिंग यांचे मराठी सिनेसृष्टीतील पाहिलं गाणे प्रदर्शित झाले आहे.’Dokyala Shot’च्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘Dokyala Shot’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here