Home नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट : 17 नोव्हेंबरपासून शुभारंभ

एका लग्नाची पुढची गोष्ट : 17 नोव्हेंबरपासून शुभारंभ

0
SHARE
एका लग्नाची पुढची गोष्ट : 17 नोव्हेंबरपासून शुभारंभ

झी मराठी वाहिनी प्रत्येकवेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन येत असते. ह्यावेळी सुद्धा एक सुंदर आणि जुन्या आठवणीत घेऊन जाणारी नाट्यकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजची तरुणपिढी मराठी नाटकांकडे वळताना आपल्याला दिसते आहे.याआधी सुद्धा हॅम्लेट आणि आता नुकतंच नटसम्राट ह्या नाटकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा घेत एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

२० वर्षांपूर्वी आलेली मन्या-मनी ची हि गोष्ट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती. २० वर्षांनंतरही हि केमिस्ट्री अगदी तशीच बघायला मिळते. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर हे दोन्ही कलाकार पुन्हा तिचा जादू रंगभूमीवर करणार आहे. पोट धरून हसत हसत दोघांच्या गोड, रंजक नात्याची गोष्ट पुन्हा एकदा पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक असतील.

ह्या नाटकाच्या प्रोमोशन साठी सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं प्रशांत दामले च्या आवाजात एका अनोख्या अंदाजात आपल्याला ऐकायला भेटणार आहे.

17 नोव्हेंबर ला एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. झी मराठी प्रस्तुत,प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचे अॉनलाईन बुकिंग : http://bit.ly/EkaLagnachiPudhachiGoshta सुरु झाले आहेत.

कथा : इम्तियाज पटेल
रूपांतरण, दिग्दर्शन:- अद्वैत दादरकर
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
संगीत : अशोक पत्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here