Home टी व्ही Lagira Zhala Jee च्या सहकलाकारांनी दिलं शितलीला सरप्राईज

Lagira Zhala Jee च्या सहकलाकारांनी दिलं शितलीला सरप्राईज

0
SHARE
Lagira Zhala Jee

झी मराठीवरील ‘Lagira Zhala Jee’ लोकप्रिय मालिका आणि त्यातील पात्रं शीतल आणि अजिंक्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नुकताच वाढदिवस झाला आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिलं.

मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री बारा वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं आणि तिकडे शीतलचा सर्व मालिकेची कास्ट आणि क्रू हजार होती. पूर्ण टेरेस फुग्यांनी सजवलं होतं. शिवानीने केक कापला आणि तसेच दुसऱ्यांना त्रास होणाऱ्या अशा आवाजात म्युजिक लावून एक छोटी पार्टी केली, असं शिवानीने सांगितलं. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचे आईवडील देखील खास तिला भेटायला मुंबईवरून साताऱ्याला गेले. शिवानीने त्यांच्यासोबत देखील वेळ घालवला, महाबळेश्वरला गेली आणि परत सेटवर आली तेव्हा परत सेटवर सर्व कलाकारांनी शिवानीला केक कापायला लावला.शिवानीसाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं. याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसंच Lagira Zhala Jee च्या माझ्या या कुटुंबाने देखील मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि हा विढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.”

Itsmajja Laagir Zal Ji

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here