Home टी व्ही घाडगेंना त्रास द्यायला कियारा अजून किती प्रयत्न करणार?

घाडगेंना त्रास द्यायला कियारा अजून किती प्रयत्न करणार?

0
SHARE
Ghadge & Sun ItsMajja

‘घाडगे अँड सून’ या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की कसं कियाराने ६ महिने खोटी प्रेग्नन्सी अगदी खऱ्या प्रेग्नन्सी सारखी घाडगेना भासवली. अक्षयला तर माहीत होतंच पण नंतर अमृताला पण ती गोष्ट समजली. दोघांनी कियाराला समजवायचा प्रयत्न केला की तू असं करू नकोस, “तू का सगळयांना फसवतेयस?”, त्यावर तिचं उत्तर असतं की, “मला माझ्या नवऱ्याचं अटेन्शन हवं होतं, मला या घरातली माझी जागा हवी होती आणि ती मला या प्रेग्नन्सी मधूनच मिळणार होती”.हे सगळं होतंय ना होतंय तितक्यात त्यांना ब्लॅकमेलिंगची पत्र यायला सुरुवात होते. ब्लॅकमेलर घरच्यांना कियाराच्या खोट्या प्रेग्नन्सी बद्दल न सांगण्याची किंमत २५ लाख सांगतो. कियारा सरळ हात वर करते आणि जे,”मी माई अण्णांना सांगणार होते ते आता ब्लॅकमेलर करतोय, मला काय माझं काम सोप्पचं झालं”.

पण असं ब्लॅकमेलरला पैसे देणं अक्षय-अमृताला पटतं नसतं म्हणून ते त्या ब्लॅकमेलरला पकडायचा प्लॅन करतात पण तो ही फसतो. आणि एकेदिवशी ब्लॅकमेलर सरळ घरी येतो, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अमृताचे काका असतात. त्यांनी घाडगेना त्रास द्यायची संधी कधीच सोडली नसते, आणि आता तर कियारामुळे त्यांच्या हातात आयतं कुळीतच मिळतं. पण काका घरात आल्यापासून अक्षयचं वागणं बदलयं हे अमृता नोटीस करत असते.

माई-अण्णा कियारा आणि भाग्यश्रीच्या डोहाळ जेवणाची तयारी करतायत. त्यातही कियारा अमृताला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही आहे. कियारा प्लॅन करते की डोहाळ जेवणाच्या दिवशी ती आणि भाग्यश्री आपापल्या नवऱ्यानं सोबत डान्स करतील आणि त्याची प्रॅक्टिस करत असताना ती मुद्दामुन अमृताला बोलावून व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावते, पण त्याचा अमृतावर काही परिणाम होत नाही.

माई साडीवाल्याला घरी बोलावतात जेणेकरुन भाग्यश्री आणि कियारा आपल्या आवडीच्या साड्या घेई शकतील, कियारा तिथेही अमृताला पुतळ्यासारखं उभं करायला लावते आणि साडी नेसवून घेते, या तिच्या कृत्यात तिची सासूही तिला साथ देते पण माईंना हे बघवत नाही अमृताचा असा कियारा वापर करुन घेतेय ते, पण त्यांचेही हात दगडाखाली असल्याकारणाने त्या काही बोलत नाही.

कियारा डोहाळ जेवणाच्याच दिवशी मिसकेरेजचं खोटं नाटक करायचं असं अक्षय-अमृताला सांगते. अखेर डोहाळ जेवणाचा दिवस येतो, ब्लॅकमेलरला म्हणजेच काकांना पैसे द्यायला अक्षय अमृताच्या नावावर असलेले प्रॉपर्टीचे पेपर अमृताकडून घेतो, तिला संशयचं असतो की हा नक्कीच ब्लॅकमेलरला हे पेपर दणार आहे आणि तेच होतं. तो माणूस काका आहे हे ही अमृताला समजतं. ती काकाचा पाणउतारा तर करतेच पण ती अक्षयलाही खुप सुनावते. कियाराचं मिसकेरेजचं नाटक पुर्ण होईल का? घाडगेंना कियारा उद्धवस्त करु शकेल का? हे सगळं बघत राहा ‘घाडगे एन्ड सुन’ मालिकेत फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here