Home टी व्ही Sony Marathi वर होणार जयडीची ग्रँड एन्ट्री

Sony Marathi वर होणार जयडीची ग्रँड एन्ट्री

0
SHARE
sony marathi itsmajja

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून जेव्हा आपण संध्याकाळी टीव्ही समोर बसतो तेव्हा आपल्याला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी पुरेपूर मनोरंजन देणाऱ्या मालिकांची गरज असते. तश्या काही मालिका आहेत जे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. झी मराठी,कलर्स मराठी,झी युवा,स्टार प्रवाह ह्या वाहिन्या सध्या मराठीमध्ये अधिराज्य गाजवत असताना Sony Marathi ह्या मालिकेने अगदी काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनावर मानाचं स्थान मिळवलं.

जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी Kiran Dhane आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झालाअसून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसं आयुष्य जगेल याचं कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात मात्र त्याच्या अगदी विरूध्द या राजकन्येचं खरं आयुष्य आहे. काहीकारणास्तव अवघडलेलं आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपलं आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेच अभिनेत्री Kiran Dhane या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे. उत्कृष्ट अभिनेत्यांची ही अदाकारी लवकरच सोनीमराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याबाबत विचारले असता, ‘यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. ‘एक होती राजकन्या’च्या निमित्तानं, एका खंबीरमुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचं, Kiran Dhane ने स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here