Home टी व्ही ‘कसा वाटला पहिला एपिसोड’ ? किरणने विचारताच चाहत्यांनी केला कौतुकांचा वर्षाव

‘कसा वाटला पहिला एपिसोड’ ? किरणने विचारताच चाहत्यांनी केला कौतुकांचा वर्षाव

0
SHARE
Ek Hoti Rajkanya Itsmajja

बाबांची राजकन्या म्हणजे ‘एक होती राजकन्या’ मालिकेतील अवनी भोसले हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोनी मराठीवरील या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेप्रती आणि किरणला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक होते. मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि किरणने हटक्या पध्दतीने सर्वांना इम्प्रेस केलं. ‘विदर्भाची भाषा बोलून राहिलं १ नं’, ‘आतुरता पुढील एपिसोडची’, ‘कमाल अभिनय’, ‘सुंदर हास्य’ यांसारखे अनेक स्पेशल कमेंट्स किरणच्या चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून किरणपर्यंत पोहचवल्या आहेत.

अभिनेत्री किरण ढाणेची ‘एक होती राजकन्या’ ही सोनी मराठीवरील मालिका नुकतीच सुरु झाली असून सोशल मिडीयावर पहिल्या एपिसोडवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. ‘कसा वाटला पहिला एपिसोड?’ एवढंच किरणने विचारल्यावर तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या नागपूरी भाषेचे, तिच्या अभिनयाचे, सुंदर हास्याचे आणि नवीन भूमिकेचे तोंडभरुन कौतुक केले आहे. नागपूरी भाषेचा गोडवा वाढवणा-या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते पुढील एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here