Home टी व्ही “माझं भाग्य आहे कि ईशा सारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली”

“माझं भाग्य आहे कि ईशा सारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली”

0
SHARE

नुकताच प्रदर्शित झालेल्या Tula Pahate Re या सिरीयल मध्ये विक्रांत सरंजामे या नायकाचा,एक खलनायकी चेहेरा आपल्याला पाहायला मिळाला, आणि अचानक बदललेल्या विक्रांत सरंजामेच्या या स्वभावामुळे सर्व प्रेक्षकांना पुरतेच गोंधळात टाकलं आहे. कारण ईशावर मनापासून प्रेम करणारा, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करणारा असा विक्रांत सरंजामे, हे सार फक्त प्रॉपर्टी च्या हव्यासापोटी करत आहे हि कल्पनाच झेंडेला ज्याप्रमाणे गोंधळात टाकते त्याप्रमाणे प्रेक्षकांना सुद्धा धक्का लावून जाते.

Tula Pahate Re मध्ये आलेल्या या नवीन आणि इंट्रेस्टिंग वळणामुळे, प्रेक्षकांच्या मनामधली उत्सुकता अजून शिगेला पोहचली आहे. कारण अचानक बदलेला विक्रांत सरंजामे, यापुढे काय करेल ? ३००० हजार करोड ची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी कोणत्या शकला घडवेल ? आणि ईशावर खोटं प्रेम करून तिचा विश्वास मिळवून, कशापद्धतीने तिचा वापर करून घेईल हे बघण्यामध्ये खरी गंम्मत आहे, प्रॉपर्टीसाठी विक्रांत अजून काय काय करेल आणि त्याला या साऱ्यांमध्ये यश मिळेल का ? हे सारे आपल्याला तुला पाहते रे च्या नवीन भागांमध्ये पाहायला मिळेल. तूर्तास Tula Pahate Re या मालिकेमध्ये घडणाऱ्या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहे एवढं मात्र नक्की !

Vikrant who was shown as the most trustworthy and lovable person in Tula Pahate Re till now, will be playing a character completely in contrast to his popular image.now the upcoming episodes will reveal the secrets behind Rajnandini’s death.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here