Home मुव्ही रिव्ह्यू स्वीट घराची स्वीट गोष्ट : होम स्वीट होम

स्वीट घराची स्वीट गोष्ट : होम स्वीट होम

0
SHARE
स्वीट घराची स्वीट गोष्ट : होम स्वीट होम

घर म्हंटल कि प्रत्येकाच्या अश्या बऱ्याच आठवणी असतात. प्रत्येकाचा घरातला आवडता कोपरा असतो..चार भिंतींच हे घर आपण आपल्या मनासारखं सजवतो.असाच प्रत्येक घराघरातील गोष्ट सहज पडद्यावर मांडणारा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला तो म्हणजे होम स्वीट होम.

अभिनेता हृषीकेश जोशी ह्यांनी दिग्दर्शकीय पदार्पण केलं ते होम स्वीट होम ह्या चित्रपटामधून.रीमा ह्यांचा हा शेवटचा मराठी चित्रपट आहे म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास होताच पण ह्या चित्रपटात अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे हा चित्रपट अजून सुंदर आणि उत्तम झाला आहे.

विद्याधर जोशी आणि श्यामल जोशी ह्या जोडप्याची हि गोष्ट आहे. मुंबईत घर घेणं खूप अवघड आहे हे आपल्याला माहित आहे पण आपल्या राहत्या घर जर विकलं तर आपल्याला येणारी रक्कम आणि नवीन घर घेऊन उरलेले पैसे आपल्याच कामी येतील अशी समजूत असणारी श्यामल आपल्या नवऱ्याला नवीन घर घेण्यासाठी कस पटवते आणि गोष्ट हळू हळू कशी पुढे जाते हे बघण्यात खर तर मज्जा आहे.चित्रपटाचा पहिला भाग थोडा संथ वाटतो परंतु दुसरा भाग छान रंगवला आहे.

रीमा ,मोहन जोशी ,स्पृहा जोशी , हृषीकेश जोशी , विभावरी देशपांडे,सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळते. मोहन जोशी आणि रीमा ताई ह्यांची भूमिका मनावर छाप पडून जाते. सहज सोप्पं अभिनय कसा असावा ते ह्या दोघांकडे पाहून कळते. स्पृहा जोशी हि आपल्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा इथे वेगळी दिसते देविकाची भूमिका साकारताना स्पृहा संपूर्ण चित्रपटत हवीहवीशी वाटते. सुमीत राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे दोघे चित्रपटात फार कमी वेळासाठी आहे परंतु त्या दोघांच्या भूमिका चित्रपटाला वेगळं वळण देऊन जातात. प्रसाद ओक, दीप्ती लेले आणि विभावरी देशपांडे ह्यांच्या भूमिका आणि अभिनय उत्तम झालाय. चित्रपटात शेवट पर्यंत लक्षात राहतात ते सोपानच्या भूमिकेतील हृषीकेश जोशी.

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. चित्रपटाच्या कथेला साजेस असं संगीत आपल्याला मंत्रमुग्ध करतात. अजून एक विशेष बाब म्हणजे चित्रपटाची सुरवात आणि शेवट सुंदर कवितेने होतो आणि चित्रपट पुढेही कवितांमुळेच जातो.

तुम्हाला तुमचा विकेंड एन्जॉय करायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा. ह्रिषीकेश जोशी च्या होम स्वीट होम ला मज्जा तर्फे ३ स्टार्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here