Home इंटरव्ह्यू प्रेक्षक म्हणतील चित्रपट बघा वन्स मोअर : नरेश बिडकर

प्रेक्षक म्हणतील चित्रपट बघा वन्स मोअर : नरेश बिडकर

0
SHARE
प्रेक्षक म्हणतील चित्रपट बघा वन्स मोअर : नरेश बिडकर

वन्स मोअर ची जर्नी कशी घडत गेली..?

मला सतत वाटत होत मला एक सिनेमा करायचा आहे. एक वेगळ्या पठडीचा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. चित्रपटाद्वारे मला एक मेसेज हि द्यायचा होता जो वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर मांडायचा होता. नंतर अचानक एक विषय सुचला तो असा होता कि “कर्म, जगात प्रत्येक जण असा विचार करतो कि माझ्याच बाबतीत असं का..? मी सगळ्यांशी चांगला वागतो मग माझ्यासोबतच असं का घडत..? मग मी श्वेता ला सांगितलं कि ह्यावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो पण मला लेक्चर नको आहे. बोलपट नको मला चित्रपट करायचा आहे. तिला माझी हि कल्पना आवडली आणि माझ्या विचारांना लक्षात घेऊन तिच्या डोक्यात एक वेगळी स्टोरी तयार झाली. त्यानंतर कोणताही चित्रपट बनवायचा असेल तर महत्वाचा दुवा असतो तो म्हणजे निर्माता. आमच्या सर्वच निर्मात्यांना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आणि आणि आमचा प्रवास सुरु झाला नंतर विष्णू मनोहर देखील जॉईन झाले आम्हाला. मुळातच ह्या चित्रपटाकडे बघताना प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः डिझाईन केली. त्याकाळातले कॉस्ट्यूम देखील जर तुम्ही बघाल तर ते आम्ही स्वतः डिझाईन केले आहेत,ते इतर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याच पध्दतीने आम्ही त्याचा ग्राफ केला,व्हीएफएक्स देखील खूप मोठ्या पद्धतीने चित्रपटात वापरले गेले आहे,त्यामुळे बजेट पण तसेच जाणार होत. आमच्या निर्मात्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ह्या सर्वांमुळे हा चित्रपट तयार झाला आहे. प्रत्येक गोष्टीवर आम्ही खूप मेहनत घेतली. एक दीड वर्ष आम्हाला लोकेशन शोधायला लागले.कोणत्याच गोष्टीत आम्ही कॉम्प्रोमाइज केले नाही जितकं चांगलं आम्हाला करता आलं ते साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि आता लोकांसमोर आणतोय हा चित्रपट जो १२ ऑक्टोबर ला रिलीज होतोय.

ह्या चित्रपटासाठी तुम्ही अभिनय हि केलाय आणि दिग्दर्शन सुद्धा केलंय…काय करताना तुम्हाला सर्वात जास्त मज्जा आली.?

लहानपणापासून मी नाटक करायचो, मी आणि माझा एक मित्र होता आम्ही एकत्र लिहायचो पण दिग्दर्शन हि करायचो. अभिनय करायचा हे लहानपणापासूनच डोक्यात होते. मुंबईत आल्यानंतर अभिनयाकडे थोडं लक्ष दिले. मनात होत दिग्दर्शन तर करायचे आहे एक चित्रपट करायचाय. पण दिग्दर्शन करायला मला जास्त आवडत.

वन्स मोअर नंतर तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत..?

आता माझं एक हिंदी चित्रपटावर काम सुरु आहे. सध्या मी एवढंच सांगू शकतो पण मी त्यातले स्टारकास्ट किव्हा इतर माहिती नाही सांगू शकत. वन्स मोर रिलीज झाल्या झाल्या मी ती अनाउन्समेंट करणार आहे. हिंदी चित्रपटासाठी ऍज अ डिरेक्टर म्हणून लवकरच मी येणार आहे.

वन्स मोअर बघून जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहा बाहेर येईल तेव्हा तो सोबत काय घेऊन जाईल..?

अतिशय चांगला प्रश्न आहे. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपल्याला हा चित्रपट बघून मिळतील. चित्रपट कुठेही बोर करत नाही हा चित्रपट बघून प्रेक्षक म्हणतील चित्रपट बघा वन्स मोअर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here