Home मुव्ही रिव्ह्यू चुंबक #MovieReview

चुंबक #MovieReview

0
SHARE
चुंबक #MovieReview
Chumbak Movie Review Itsmajja

अक्षय कुमार एक मराठी चित्रपट करतोय हि गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि बघता बघता चित्रपट ह्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
कधी कधी आपण चांगलं वागून सुद्धा आपल्या हाती काही लागत नाही. अशावेळेला आपण त्या परिस्थितीला कसे निभावून नेतो आणि त्या परिस्थितीचा कसा सामना करतो वाईटातून पण चांगलं कसे करू शकतो ह्याला खरंतर काही वय नसतं मनाला एखादी गोष्ट पटली ती कि लगेच करून टाकायची अश्या प्रकारची देखील माणसे ह्या जगात असतात.

मुंबई च्या हॉटेल मध्ये काम करणारा बाळू आणि त्याचा मित्र डिस्को. बाळू च्या एका मित्राने त्याला खोट्या स्कीम मध्ये अडकवून त्याच्या जवळचे होते नव्हते ते पैसे डुबवले. आता जग असच आहे सगळी कडे हाच बिसिनेस चालू आहे म्हणत डिस्को बाळू ला झटपट पैसे कमवायची कल्पना देतो आणि मग त्याची ओळख होते ती प्रस्सन यांच्याशी. मग स्वतःच्या हाताने केलेला गुंता आणि नशिबात आलेला प्रसन्न ह्या सगळ्या गोष्टीवर कशी मात करतो हे जाणून घ्यायचं असेल तर चुंबक तुम्हाला बघावा लागेल.

चित्रपटाचा पहिला भाग तुमचे निक्खळ मनोरंजन करतो. कुठेही अजिबात कंटाळा येत नाही. मात्र चित्रपटाचा नंतरचा भाग मात्र थोडा खेचल्यासारखा जाणवतो. काही गोष्टींची गरज नसताना त्या चित्रपटात आहे असे जाणवू लागते. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन. मुंबई चे दर्शन असो किव्हा इतर कोणताही सिन चित्रपट डोळ्याला सुखावणारा आहे.

प्रस्सन च्या भूमिकेत असणारे स्वानंद किरकिरे ह्यांनी अक्षरशः त्यांच्या भूमिकेत जीव ओतलाय. त्याची देहबोली आणि भाषाशैली ह्यामुळे चित्रपट बघण्यात आणि विशेष करून त्यांनी साकारलेली भूमिका बघायला आधी मज्जा येते. चित्रपटात खूप कलाकार नाही. चित्रपट फक्त प्रस्सन आणि बाळू चा आहे त्यांच्या अव्यक्त प्रेमाचा,आदराचा,माणुसकीचा आणि काळजीचा आहे. बाळू ची भूमिका करणारा साहिल जाधव देखील विशेष भाव खाऊन जातो.

चित्रपट हसवतो आपल्यातल्या माणुसकीची जाणीव करून देतो आणि चेहऱ्यावर एक स्मितहास्य सोडून जातो. चुंबक हा चित्रपट त्याच्या वेगळ्या कथानकाची एकदा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. मज्जा.कॉम तर्फे चुंबक ह्या चित्रपटाला ३ स्टार्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here