Home नाटक अश्रूंची झाली फूले..पुन्हा रंग भुमीवर?

अश्रूंची झाली फूले..पुन्हा रंग भुमीवर?

0
SHARE
अश्रूंची झाली फूले..पुन्हा रंग भुमीवर?

नाटक, रंगभूमी ही प्रत्येक कलाकाराच्या फारच जवळची असते, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘सुबोध भावे’. अजरामर अशा अनेक कलाकृतींना सुबोधने एक नवीन जन्मचं दिला आहे. अल्फा मराठी असल्यापासून सुबोधचं नातं झी सोबत आहे. ‘आभाळमाया’ या अजरामर मालिकेतून त्याने झी मराठीच्या परिवारात पदार्पण केले आणि आता तर तो या परिवाराचा एक अविभाज्य घटकचं बनला आहे. सुबोधने जुन्या नाटकांना, चित्रपटांना नव्याने उजाळा दिला. ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचा चित्रपट आपल्या अभिनयाने तितकाच लक्षवेधी ठरवला. ‘आम्ही असू लाडके’, ‘एक डोव धोबी पछाड’, ‘उलाढाल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘बालक पालक’, ‘लोकमान्य:एक युगपुरुष’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून तर त्याने अभिनयापरीची त्याची व्याख्या, त्याचं डेडीकेशन एका उच्च स्थरावरचं नेऊन ठेवलं. सुबोधने या साऱ्या चित्रपटांमधून तो उत्तम अभिनेता आहे हे दाखवून तर दिलेच पण ‘कट्यार काळजात घूसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो तितकाच चांगला दिग्दर्शक आहे हे ही दाखवले.

सध्या सुबोधच्या सोशल मिडाया अकांउंट्सवर एक फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘एका नव्या पर्वाची सुरुवात’ असं लिहीलं आहे. एक नवीन नाटक जन्माला येतंयं हे तर नक्की पण सुबोधने शेअर केलेल्या त्या पोस्टवरुन आणि त्या खालच्या कमेंट्सवरुन ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक पुन्हा रंगभूमी गाजवायला येतंय का अशी उत्सूक्ता लागली आहे. कारण, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सुबोधने केलेला ‘लाल्या’ प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आणि आता पुन्हा तोच ‘लाल्या’ रंगभूमीवर रिएन्ट्री करणार आहे का? सुबोध नक्कीच एक नवीन कलाकृती घेऊन येतोय पण ती नक्की कोणती ते अद्याप गुलदस्त्यात आहे आणि या नव्या कलाकृतीत त्याची दिग्दर्शाकाची भूमिका आहे की कलाकाराची हे ही गुलदस्त्यात आहे.

View this post on Instagram

लवकरच……….

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here