Home नाटक अश्रूंची झाली फुले चा पहिला प्रयोग नक्की असणार कुठे?

अश्रूंची झाली फुले चा पहिला प्रयोग नक्की असणार कुठे?

0
SHARE
ashrunchi zali phule itsmajja

सुबोध भावेने काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक विडिओ शेअर केला होता ज्याच्या केप्शनमध्ये ‘एका नव्या पर्वाची सुरुवात’ असं लिहिलं होतं. प्रेक्षकांनी अंदाज लावलाही की ‘अश्रूंची झाली फुले’ हे अजरामर नाटक पुन्हा रंगभूमी गाजवायला येतंय की काय? आणि झालं अगदी तसंच. सुबोधच्याच अकाउंटवरून आणखी एक व्हिडिओ शेअर केला त्यात या नाटकात जे कलाकार असणार आहेत त्यांनी आपली ओळख सांगितली आणि व्हिडीओच्या शेवटी अजून एक कलाकार कोण असेल याची उत्सुकता शिगेला नेऊन ठेवली. पण काहीच दिवसांनंतर या नाटकाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले?

अनामिका कान्हाज मॅजिक निर्मित, साईसाक्षी प्रकाशित आणि ‘प्राध्यापक वसंत कानेटकर’ लिखित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ ‘१ मे महाराष्ट्र दिन’ला होणार आहे. याच पोस्टरमध्ये सुबोध भावे या नाटकात कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘लाल्या’ या भूमिकेतूनच सुबोध आपल्यासमोर येणार यात तर काही शंकाच नाही.या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले असून, दिनेश पेडणेकर, मंजिरी भावे, राहुल कर्णिक, अभिजित देशपांडे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. तसेच शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

अद्याप ‘१ मे’ला प्रयोग नक्की कुठे असणार हे गुलदस्त्यात आहे. सुबोध भावेने नुकताच प्रयोग कुठे असू शकेल या बाबतीतली हिंट एका फोटो मार्फत दिली आहे, ज्याच्या केप्शनमध्ये “मे तुला सांगतो अश्रूंचा पहिला प्रयोग कुठे आहे.. १ मे ला अशा ठिकाणी आहे जिथे भारतातला एक मोठा सोहळा होतो.. ओळखा आता?”. आता प्रेक्षकांना हे नेमकं कोणतं ठिकाण असेल हे ओळखून दाखवायचं आहे. प्राध्यापक वसंत कानेटकरांनी या अजरामर नाटकाला जन्म दिला आणि त्याचा वारसा सुबोध भावे नक्कीच चालववेल यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here