Home टी व्ही अण्णांनी सरिताला सुखरुप घरी आणले

अण्णांनी सरिताला सुखरुप घरी आणले

0
SHARE
Ratris Khel Chale ItsMajja

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दत्ता सरिताला घराबाहेर काढतो, पण दुसऱ्यादिवशी जेव्हा ती घराच्या आजुबाजुला दिसत नाही त्याचा जीव घाबरा होतो आणि तो तिला शोधायला लागतो. सरिता गायब झाल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचते आणि पोलिस नाईकांच्या वाड्यावर पोहोचतात. पोलिसांना एक मृतदेह सापडला असतो आणि त्यांना संशय असतो की तो सरिताचा आहे, म्हणून ते दत्ताला शाहानिशा करण्यासाठी सोबत घेऊन जातात. सुदैवाने ती सरिता नसते, पण मग सरिता कुठे आहे असा प्रश्न नाईकांसमोर पडतो.

दत्ताची आई, दत्ता, अभिराम, नाना इतकच काय छाया पण त्याच काळजीत असते. अण्णा घरी येतात आणि त्यांच्या मागोमाग शेवंताही सरिताची चौकशी करायला येते. शेवंताचं असं म्हणणं असतं की तिलाही सरिताची तितकीच काळजी आहे जितकी नाईकांना आहे, म्हणून अण्णांना ती दत्ताला वचन द्यायला सांगते की तुम्ही सरिताला सुखरुप घरी आणायचं आणि अण्णा तसं वचनही दत्ताला देतात.

नेहमीप्रमाणे अण्णा त्यांच्या अड्यावर बसलेले असतात, तिथे त्यांचा माणूस येतो आणि शेवंताच्या घरी सरिता वहिणीनीचं भुत पाहिलं असं म्हणतो, अण्णा त्याच्या तोंडून शेवंताचं नाव ऐकून त्याच्या कान शिलात भडकवतात आणि लागलीच शेवंताच्या घरी जातात. सरिता आत स्वयंपाकघरात बसलेली असते. अण्णा आल्याचं समजताच शेवंता बाहेर येते, तिच्या गळ्यात माईंची असलेली माळ परत देते आणि आत त्यांच्यासाठी चहा आणायला जाते. पण अण्णांच्या नजरेतुन काही सुटत नाही आणि सरिता तिथेच आहे हे त्यांना समजतं आणि तिला ते सुखरुप घरी घेऊन येतात.

नाईक त्यांची सुन परत आली म्हणून खुप खुश असतात. त्यादिवशी सगळं जेवन सरिताच करते आणि सगळे घरातले एकत्र जेवायला बसतात, अगदी अण्णासुद्धा. सरिता घराकडे सुखरुप परत आली खरी पण तीन दिवस ती कुठे होती हे आनंदाच्या ओघात तिला कोण विचारतच नाही पण पांडू नेमकी विचारतो आणि, ते ऐकुन सरिताच्या हातातला पाण्याचा तांब्या अण्णांच्या ताटात पडतो. सरिता शेवंताकडे होती हे सत्य बाहेर येईल का? पोलिसांच्या प्रश्न उत्तरांना सरिता कशी सामोरी जाणार? हे पाण्यासाठी बघत राहा ‘रात्रीस खेळ चाले’ फक्त झी मराठी वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here