Home न्यूज रंपाटमध्ये अंकुश आणि अमृता?

रंपाटमध्ये अंकुश आणि अमृता?

0
SHARE
Rampaat Marathi Movie ItsMajja

‘रवी जाधव’ दिग्दर्शित ‘रंपाट’ या नव्या चित्रपटात ‘अभिनय बेर्डे’ आणि ‘कश्मिरा परदेसी’ ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. ‘१७ मे’ला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच ‘आईची आन रे’ हे गाणं रिलीज झालं आहे.

गाण्याची सुरुवात एका रेल्वे स्टेशनवर होते जिथे अभिनय बेर्डे आपल्या अभिनयाच्या वाटचाली करता नव्या शहरात जाताना दिसतोय, आणि कश्मिराही तीची स्वप्न पुर्ण करायला नव्या दिशा शोधताना दिसतेय. गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ‘अंकुश चौधरी’ आणि ‘अमृता खानविलकर’ यांचा गेस्ट अपिअरन्स आहे. गाण्याचं कंपोझिशन हे आजच्या काळातल्या उडत्या चालीच जरी असलं तरी हे गाणं ‘बंटी और बबली’ या हिंदी चित्रपटातल्या ‘धडक धडक’ या गाण्याची आठवण करुन देणारं आहे. त्याच हिंदी गाण्यातल्या सारखे दोघांचे कपडे, गाण्याची चाल, साधारण मिळतं जूळतं लोकेशन असं हे ‘आईची आन रे’ गाणं भासवतयं‘रंपाट’ मधल्या या ‘आईची आन रे’ या गाण्याचे बोल ‘गुरु ठाकूर’ यांनी लिहीले आहेत, ‘चिनार’ आणि ‘महेश’ यांनी हे गाणं आजच्या तरुणाईला आपलंसं वाटेल अशा प्रकारे संगीतबध्द केलं आहे. तरुणाईचा आवाज समजल्या जाणाऱ्या ‘बेला शेंडे’ आणि ‘हर्शवर्धन वावरे’ यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यात अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकरला घेऊन या गाण्याचं प्रेझेंटेशन वाढवायचा प्रयत्न रवी जाधवांनी नक्कीच केला आहे.

गाणं ऐकल्यानंतर ते ओरिजनल गाणं नसून त्या गाण्याची चाल, कोणत्या ना कोणत्या गाण्याच्या चालीशी मिळती जूळती आहे हे नक्कीच जानवून येतं. ‘बंटी और बबली’ या चित्रपटातल्या ‘धडक धडक’ या गाण्यातही ‘राणी मुखर्जी’ आणि ‘अभिषेक बच्चन’ असेच आयुष्य आजमवायला नवीन शहराकडे जाताना गाणं गातात, असंचं हे ‘आईची आन रे’ गाणं पाहाताना वाटतं. पण रवी जाधवांनी केला हा प्रयत्न प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहाण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पाहावी लागणार.

या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टूडिओज’ आणि ‘मेघना जाधव’ यांनी केली आहे. गाण्यात दोघेही कलाकार एकमेकांच्या समोर आलेले दाखवले आहेत पण पुढे त्यांच्या आयुष्यात काय ‘रंपाट’ गोष्टी घडणार हे पाहायला ‘१७ मे’ला जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here