Home न्यूज अमेय वाघ शोधतोय ‘गर्लफ्रेंड’

अमेय वाघ शोधतोय ‘गर्लफ्रेंड’

0
SHARE
Amey Wagh Girlfriend Itsmajja

अमेय वाघ हा एक हरहून्नरी कलाकार नेहमीच काही ना काही नव नवीन प्रयोग करत असतोच. झी मराठी वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतुन आपल्यासमोर आला, आणि त्यानंतर तर त्याने त्याच्या करिअरची एक एक पायरी चढायला सुरुवातच केली.

अमेय वाघने काही दिवसांपुर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये मुलींची काही नावे सजेस्ट करायला सांगितली होती. आता त्या फोटोमागचं कारण अमेयनेच उलघडलं आहे. त्याने त्या मुलींची नावं या ‘नचिकेत प्रधान’साठी मागितली होती. मुलींची नावं या नचिकेतच्या गर्लफ्रेंडसाठीच हवी होती. आता तुम्हाला वाटेल काय चालंय नेमकी? तर अमेय वाघ एका नवीन चित्रपटातुन आपल्या भेटीला येतोय. ‘गर्लफ्रेंड’ नावाच्या त्याच्या या चित्रपटात त्याने ‘नचिकेत प्रधान’ नावाच्या सिंगल पोराची भुमिका केली आहे.

आजकालच्या सिंगल मुलांच्या बेसिक गरजेत ‘गर्लफ्रेंड’ही येते आणि त्याच सोधात हा नचिकेत आहे असं या पोस्टरमधून आपण अंदाज लावू शकतो. ‘ह्युज प्रोडक्शन’ आणि ‘प्रतिसाद प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या सिनेमाचं लेखन ‘उपेन्द्र सिधये’ यांनी केलं आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे याची निर्मिती ‘अनिश जोग’, ‘रणजित गुगळे’, ‘अफीफा सुलेमान नाडियदवाला’, ‘कौस्तुभ धामणे’, ‘अमेय पाटील’ आणि ‘सलील मिलिंद दातार’ या 6 निर्मात्यांनी मिळून केली आहे.

अभिनेता सुयोग गोऱ्हेनेही हा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. Intresting गोष्ट म्हणजे आपली लाडकी जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनिलनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा सेम पोस्टर पोस्ट केला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहाता चित्रपटाचा नायकंचं फक्त दिसतोय आणि नायिकेची जागा रिकामी दिसतेय आता नायिका कोण असणार? रसिका सुनिल असणार आहे का नचिकेत प्रधानची गर्लफ्रेंड. अमेय वाघ आणि रसिका सुनिलची नवी जोडी पाहायला मिळणार का?

‘कास्टिंग काऊच’, ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’, ‘अमर फोटो स्टुडीओ’ नंतर आता अमेय वाघ ‘गर्लफ्रेंड’ हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येतोय, तर त्याला खुप शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजनासाठी सज्ज असलेल्या या चित्रपटाची प्रतिक्षा करुयात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here