Home ट्रेलर ‘Aasud’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘Aasud’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0
SHARE
‘Aasud’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवत शेतकऱ्यांच्या हितासाठी एका युवकाचा व्यवस्थेविरोधातला धडाकेबाज लढा दाखवणाऱ्या ‘Aasud’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन आणि इमोशनचा तडका असलेल्या या ट्रेलरला सोशल माध्यमावर प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. ‘Aasud’ हा राजकीय महापट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘Aasud’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवी आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत.

Aasud या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here