Home न्यूज आमिर खान च्या ह्या चित्रपटाचं लेखन करणार मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी

आमिर खान च्या ह्या चित्रपटाचं लेखन करणार मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी

0
SHARE
आमिर खान च्या ह्या चित्रपटाचं लेखन करणार मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी

अनेक अभिनेत्यांचे चित्रपट जसे यशस्वी होतात तसेच ते बॉक्स-ऑफिस वर जोरदार आपटतात सुद्धा..आमिर खान ह्या सुपरहिट अभिनेत्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत आणि नुकताच आपटलेला थग्स ऑफ हिंदुस्थान देखील कोणाच्या नजरेतून सुटलेला नाही तरीही आमिर चे चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट्सची वाट बघत उत्सुक असतात.

आज दिनांक १४ मार्च म्हणजे आमिर खान ह्याचा वाढदिवस आणि आपल्या ह्याच वाढदिवसाचं निम्मित साधून आमिर ने त्याच्या नवीन चित्रपटाचा खुलासा केला आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचे नाव आहे “लाल सिंग चड्ढा”

ह्या चित्रपटाची अजून एक खास बात म्हणजे ह्या चित्रपटाचे लेखन मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी करणार आहेत. अतुल कुलकर्णी ह्यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी मध्येही आपले पाय घट्ट रोवले आहेत. आणि आता “लाल सिंग चड्ढा” ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लेखकाच्या रूपाने ते आपल्या समोर येत आहेत. राजवाडे अँड सन्स,हैप्पी जर्नी,नटरंग,प्रेमाची गोष्ट ह्या अनेक चित्रपटामधून अभिनेते अतुल कुलकर्णी ह्यांचा दर्जेदार अभिनय आपण पाहिलाच आहे.

“लाल सिंग चड्ढा” हा चित्रपट ऑस्कर विजेता चित्रपट फॉरेस्ट गम्प चा रिमेक असणार आहे. आणि ह्यासाठी आमिर खान ने चक्क २० किलो वजन कमी करणार असल्याचे दिसून येणार आहे.

आता हा चित्रपट बॉक्सऑफिस वर हिट होतोय कि फ्लॉप हि येणारी वेळच सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here