Home इंटरव्ह्यू नितीन कांबळे घेऊन येत आहेत तीन दमदार सिनेमे…

नितीन कांबळे घेऊन येत आहेत तीन दमदार सिनेमे…

0
SHARE
Nitin Kamble Exclusive Interview ItsMajja

मराठी सिनेसृष्टीसाठी 2018 हे वर्ष ब्लॉगबस्टर ठरलं असं नक्कीच म्हणता येईल. ‘मुंबई-पुणे-मूंबई 3’, ‘बकेट लिस्ट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पुष्पक विमान’ यांसारख्या अनेक मराठी हिट चित्रपटांनी चित्रपटगृह दणाणून टाकली. ‘नितीन कांबळे’ हे त्याच हिट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ‘वेल डन भाल्या’, ‘मी आणि U’,’ शिरपा’, ‘धो धो पावसाची वनडे मॅच’, ‘चंद्रकला’, यासारखे मराठी चित्रपटांना त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
2019 मध्ये आणखी 3 चित्रपट ते आपल्या भेटीला घेऊन येत आहेत, याच संदर्भात ItsMajja वर आम्ही नितीन कांबळेंची मुलाखत घेतली. कोणते नवीन चित्रपट आहेत?, नवीन स्टारकास्ट आहे का? याबद्दल जाणून घेऊयात या मुलाखतीतून.

1.2019 मध्ये कोणकोणते नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहात?

या वर्षात माझे 3 चित्रपट येत आहेत. कॉफी, प्रेम योगायोग आणि लडतर हे चित्रपट येतायत. त्यात प्रथम माझा कॉफी हा चित्रपट रिलीज होतोय त्यानंतर लडतर आणि मग प्रेम योगायोग अशा सिक्वेन्सने रिलीज होत आहेत.

2.मराठीत अनेक लव्ह स्टोरीज येतात पण ‘लडत’र ची लव्ह स्टोरी काय आहे आणि कशी वेगळी आहे?

प्रत्येक दिग्दर्शक जे लव्ह स्टोरीवर चित्रपट तयार करतात सगळेच म्हणतात की माझा चित्रपटाची कथा वेगळी आहे, पण नेमकी ती कशी वेगळी आहे हे प्रेक्षक मायबापचं ठरवतात. ‘लडतर’ या चित्रपटाबद्दल म्हणायचं झालं तर, हा सिनेमा ग्रामीण जीवनावर आधारित आहे, ग्रामीण भागातली लव्ह स्टोरी आहे, या चित्रपटाची खासियत म्हणजे याची शुटींग ही बऱ्याच युनिक लोकशन्सवर केली आहे.

तसेच एक नवा चेहेरा लोकांसमोर येतोय. एका नव्या अभिनेत्रीला या चित्रपटातुन इन्र्टोड्युस करतोय. तसेच यातले तीन जे प्रमुख कलाकार आहेत ज्यांची नावे, ‘विवेक चाबूकस्वार’, ‘हंसराज जगताप’ आणि ‘मच्छिंद्र’ अशी आहेत हे तिघेही ‘National Award Winner’ आहेत. चित्रपटात जी नवीव अभिनेत्री पदार्पण करतेय तिचं नाव आहे ‘अंकिता चव्हाण’. तर गावातली ही तिन मुलं आणि त्यांच्यापैकी एकाच्या आयुष्यात येणारी ही मुलगी असं साधारण ‘लडतर’ या चित्रपटाचं कथानक आहे.

3.तुमच्या प्रत्येक चित्रपटातुन नेहेमीच एक मेसेज तुम्ही देत आला आहात तर या चित्रपटातुन काही मेसेज प्रेक्षकांना देणार आहात का?

हो नक्कीच. मी नेहमीच सामाजिक संदेश देणारी फिल्मचं करतो. यातही एक छानसा मेसेज देण्याचा मी प्रयत्न केला आहे. एका लव्ह स्टोरीतुन मी हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाच्या माध्यमातुन आजच्या युवा पिढीत प्रबोधन घडवून आणण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे असं नक्की म्हणता येईल. कारण प्रेम म्हटलं की युवा पिढी ही वाहावतच जाते, पण कुणीतरी केलं म्हणून आपण केलेलं प्रेम, किंवा प्रेमाचे लोण उधळत त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे दाखवायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरुणाई या चित्रपटाचं टाग्रेट ऑडियन्स आहे.

4.प्रेम योगायोग या चित्रपटाबद्दल काय सांगाल?

प्रेम योगायोग या चित्रपटातु मधुरा वैद्य हा नवा चेहेरा आपल्यासमोर येतोय. मिलींद शिरोळे हा या चित्रपटाचा नायक आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपुर्ण चित्रपट मनाली आणि शिमलामध्ये शुट झाला आहे. मराठीत खुप कमी सिनेमे हे ट्रेव्हल सिनेमे असतात, तर मराठीतला प्रेम योगायोग हा एक ट्रेव्हल सिनेमा आहे.

दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना ट्रेव्हल करताना भेटतात, मग त्यांचा डेस्टिनेशन पर्यंतचा प्रवास, एकमेकांना केलेली मदत, ओघाने वाढणारी जवळीकता, व्यक्त न करु शकणारे प्रेम, येणारी संकंटं, कसे आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत याचा केलेला विचार, असा हा एक प्रवास या सिनेमातुन मांडला आहे.

प्रेम योगायोग सिनेमा एक कमर्शियल सिनेमा आहे. तसेच पहिल्यांदाच या सिनेमात चार गाण्यांना चार संगीतकारांनी संगीत दिलं आहे. सलील कुलकर्णी, तृप्ती चव्हाण, अनंत, राजेश सामंत या चौघांनी संगीत दिलं आहे. तसेच अवधूत गुप्ते, स्वपनील बांदोडकर, साधना सरगम, राहुल रानडे यांसारख्या गायकांनी धमाकेदार गाणीही गायली आहेत. हा सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे.

5.कॉफी या सिनेबद्दल काय सांगाल?

कॉफी हा सिनेमा नाते संबंधांवर भाष्य करणारा एक सिनेमा आहे. आजकाल मुंबईसारख्या मोठ्या शहरात जिथे एक प्रकारची ओव्हरस्पेस असते, तिथे आपण प्रेम करतो, लग्न करतो, पण कधी कधी काय होतं की आपल्याला या सगळ्याचा Nosia येऊ शकतो, त्याचं कारण बऱ्याचदा आपल्यातली ती किंवा आपल्यातला तो असु शकतो, किंवा आपल्याला हवी असलेली दुसरी एखादी आयडियल व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते, तेव्हा होणारी जीवाची घालमेल ही या चित्रपटातुन पाहाता येईल. या चित्रपट जुन महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नितीन कांबळेंशी बातचीत केल्यानंतर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली की, जुन आणि जुलैमध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहात मराठी चित्रपटांची मस्त मैफिल पाहायला मिळणार यात वादच नाही. आणि मराठी सिनेसृष्टीत नव्या कलाकारांचीही भर पडणार हे ही नक्कीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here