अभिनेत्री माधुरी पवार ही तिच्या नृत्यकलेमुळे विशेष चर्चेत असते. शिवाय तिची अभिनयक्षेत्रातील आवड पाहता तिने अभिनयक्षेत्रात आपला जम बसावयाला सुरुवात केली आहे. तुझ्यात जीव रंगला, देव माणूस या मालिकेतून माधुरीने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली. याशिवाय माधुरीची रानबाजार या वेबसिरीजमधील भूमिका विशेष चर्चेत राहिली. अभिनयक्षेत्रात जम बसवू पाहणारी माधुरी खऱ्या आयुष्यात मात्र खूप बिनधास्त आहे.(Madhuri Pawar Incident)
मूळच्या सातारच्या असलेल्या माधुरी पवारांची सिनेमाविश्वातील एन्ट्री ही काही साधी सोपी नव्हती. घरची परिस्थिती बिकट असताना पत्र्याच्या घरात राहून माधुरीने तीच शिक्षण पूर्ण केलं. सोबत तिने डान्सची आवडही जोपासली. शाळेत असल्यापासून माधुरीचा वागणं बोलणं रफ टफ आहे. नुकतीच इट्स मज्जाने माझ्या घराची गोष्ट या सेगमेंटमध्ये माधुरी पवार हिची मुलाखत घेतली. त्यावेळी माधुरीने तिचा कॉलेजमधील एक किस्सा शेअर केला. माधुरीने अकरावीत असताना तिची एका मुलाने छेड काढल्याचं म्हटलं आहे.
पाहा नक्की काय घडलं होतं माधुरी सोबत (Madhuri Pawar Incident)
याबाबत बोलताना माधुरी म्हणाली, “कॉलेजला जायला दोन रस्ते होते, पण ढोर गल्लीतून जाण्यात अडचणी यायच्या. तिथली पोरं फार डेंजर होती. तो भांडणाचा एरिया होता, त्यामुळे तिकडून जायचं नाही, असं सगळे सांगायचे. पण मी तिथूनच जायचे, मला तिथूनच जायला आवडायचं.”(Madhuri Pawar Incident)
हे देखील वाचा – “झोपडपट्टी मध्ये दिवस काढले, आज एवढं मोठं आहे घर” वाचा माधुरी पवारची स्ट्रगल स्टोरी
पुढे माधुरी म्हणाली, “एकदा मी तिथून जात होते आणि एका मुलाने शिट्टी मारली. मी त्याला विचारलं की शिट्टी कोणी मारली, तर ते म्हणाले, ‘आम्ही नाही मारली तुला आवाज आला असेल.’ मग मी कौतुक केलं, खूप छान शिट्टी मारली वगैरे. तो रक्षाबंधनचा दिवस होता, मी कौतुक केल्यावर एक मुलगा समोर आला आणि त्याने शिट्टी मारल्याची कबुली दिली. मग मी माझ्या बॅगेतून राखी काढली आणि त्याच्या हातावर बांधली. शिवाय मी त्याला म्हटलं की आता दरवर्षी माझ्या घरी राखीला यायचं. त्यानंतर जवळपास ७-८ वर्षे तो रक्षाबंधनाला घरी यायचा.”(Madhuri Pawar Incident)
‘आता त्या मुलाशी काही संपर्क नाही’ असंही माधुरी पुढे म्हणाली.